shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनो गरज म्हणून अभ्यास करा तहसीलदार राजेश गिड्डे साने गुरुजी निवासी विद्यालयात गणवेश वाटप संपन्न!!

प्रकाश मुंडे/बीड जिल्हा प्रतिनिधी:-

येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात केज तालुक्याचे तहसीलदार राजेश गिड्डे  यांच्या हस्ते निवासी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले .याप्रसंगी तहसीलदार राजेश गिड्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनो शिक्षण घेत असताना गरज म्हणून शिक्षण घ्या त्याला ऐच्छिक समजू नका, शिक्षण हे ऐच्छिक नसते ती गरज वाटली पाहिजे, गरज वाटते तेव्हाच माणूस यशाची शिखरे पादाक्रांत करत असतो. शिक्षण घेत असताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे मार्गदर्शन, खरं बोलणे, परिश्रम घेणे या होत. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास यश निश्चित असते फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे व त्याचबरोबर खरं सुद्धा बोलणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 



शिक्षणाबरोबर खेळाची सुद्धा तितकीच गरज आहे खेळ सुद्धा खेळले पाहिजेत मी शालेय जीवनात सतत क्रिकेट खेळत होतो . एक वेळेस शाळा बुडवून क्रिकेट खेळल्याने वडिलांनी शाळा बंद केली आणि मग मी मात्र आईला कन्व्हिन्स करून पुन्हा शाळेत गेलो व पुन्हा कधीच अशी वेळ येऊ दिली नाही की त्यांनी मला शाळेत जा म्हणावं हा अनुभव देखील विद्यार्थ्यांसोबत आदरणीय साहेबांनी शेअर केला.आणि आणखीनही खेळतो पण गरज म्हणून अभ्यासाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तसेच शाळेत येताना नीटनेटकेपणाने व व्यवस्थित तयारीने यावे जर आपण कोणत्याच बाबतीत सक्रिय नसू तेव्हा कोणीही शिक्षक आपल्याला वाहवा देत नाही चांगले हुशार असेल तर शिक्षक सुद्धा आपल्याला प्रेरित करतात.हे त्यांनी स्वतःचेच उदाहरण देताना सांगितले . 

मी केज ला आलो तेव्हा मला असे वाटले की आता मी या नवीन ठिकाणी आलो पण ज्या वेळेस केज मधीलच काही विद्यार्थी माझे स्पर्धा परीक्षेतील सोबती आहेत हे लक्षात आल्यावर इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे याची जाणीव मला झाली आणि केज मध्ये आल्याचा आनंद देखील झाला. त्याचबरोबर अध्यक्षीय  भाषणात बोलत असताना बद्दल प्रशासकीय अधिकारी कसा असावा याचे एक उदाहरण देऊन साहेबांचा आदर करत अशाच प्रशासकीय अधिकाऱ्याची सध्याला गरज आहे असे गौरव उद्गार काढले. तर विद्यार्थ्यांना आपली परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणात सर्व काही बदलू शकतो असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य डॉ.कविता कराड यांनी केले तर सूत्रसंचालन श्री चोले सर यांनी केले. प्रतिनिधी स्वरूपामध्ये काही विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून साहेबांनी पुन्हा विद्यार्थ्यांसोबत सह भोजनास येण्याची अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली. 

कार्यक्रमास शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

close