shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान सोसायटीच्या इतिहासात ऐतिहासिक क्षण.. सुजय विखे पा. यांच्या हस्ते तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या धनादेशाचे वाटप..!



डॉ सुजय विखे पाटलांकडून चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाच्या कार्याचं तोंडभरून कौतुक..!

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने दुर्दैवी घटनेत अथवा अपघातात मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सोसायटी आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप युवानेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच शिर्डी व राहता नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोसायटीच्या वतीने करण्यात आला 
 
याप्रसंगी बोलतांना डॉ सुजय विखे पाटील यांनी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व संचालक मंडळाच्या कार्याच कौतुक करत आजचा हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत जरी विठ्ठल पवार यांनी आमच्या विरोधात पॅनल तयार करत निवडणूक जिंकली असली तरी आमच्या विरोधात कधीही खालच्या पातळीवर टीका केली नाही त्यामुळे कामगारांच्या हितासाठी त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला आवाज दिला तेव्हा आम्ही सोसायटीच्या पाठीशी उभे राहिलो आणि यापुढे सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायम पाठीशी उभे राहू असा शब्द यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांनी दिला 

बँक ऑफ बडोदाच्या वतीने देखील यावेळी या सर्व प्रक्रियेत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षजी खाडीलकर व संस्थान प्रशासनातील अधिकारी,चेअरमन विठ्ठल पवार यांचे अथक प्रयत्न व डॉ सुजय विखे पाटील यांनी केलेली मदत यांचा उल्लेख करत उपस्थितांचे आभार मानण्यात आले 

यावेळी साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार,शिर्डीच्या नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष,नगरसेवक,राहता नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ,नगरसेवक तसेच शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी,बँक ऑफ बडोदा चे झोनल मॅनेजर,शिर्डी शाखा व्यवस्थापक,साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार (पाटील) होते, तर व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते (पाटील) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संचालक मंडळातील महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे (पा.), संभाजी शिवाजी तुरकणे (पा.), देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते (पा.), मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार (पा.), रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे (पा.), इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप (पा.), सौ. लता मधुकर बारसे (पा.), रंभाजी काशिनाथ गागरे आणि भाऊसाहेब भानुदास लबडे (पा.) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन आणि आभार प्रदर्शन करताना संस्थेचे सचिव विलास गोरखनाथ वाणी (पा.), सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे (पा.) आणि सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते (पा.) यांनी मोलाची भूमिका बजावली.सुत्रसंचालन विशाल तिडकेसर यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव विलास वाणी यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
close