shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसादनगर (राहुरी फॅक्टरी) येथे मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन.!

राहुरी दि. २२ मार्च 
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आप्पासाहेब ढूस मित्र मंडळ, साऊ एकल महिला समिती., राहुरी तालुका वात्सल्य समिती.., एसबीआय फाउंडेशन मुंबई.., डॉ. माने मेडिकल फाउंडेशन, राहुरी.., युगंधरा सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान राहुरी.., सहारा फाउंडेशन देवळाली प्रवरा.. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २२ मार्च- २०२६ रोजी डी पॉल इंग्लिश मिडियम स्कूल, श्रीशिवाजीनगर तथा प्रसादनगर राहुरी फॅक्टरी येथे सकाळी १० ते दुपारी ०२ वाजे पर्यंत राहुरी फॅक्टरी पंचक्रोशीतील एकल तसेच गरजू महिलांसाठी मोफत स्त्रीरोग व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

      नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांचे हस्ते फीत कापून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
        राहुरी फॅक्टरी येथील १७४  महिलांनी या शिबिरात उपस्थित राहून सहभाग नोंदविला.. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, नगरसेविका सौ. पल्लवी वैभव ढूस, युगंधरा च्या सौ. प्रमिलाताई गावडे, राजश्रीताई तुपे, पद्माताई कदम, सौ. नंदा ढूस, प्रहारच्या राहुरी फॅक्टरी महिला शहर प्रमुख रजनीताई कांबळे, उपप्रमुख अफसाना शेख, लतिकाताई निकम, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख चंद्रकांत कराळे, प्रहारचे देवळाली प्रवरा शहर संघटक गणेश भालके, प्रभाकर कांबळे, डॉ माने मेडिकल फाउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे, 
प्रकल्प समन्वयक रोहित चव्हाण, पोपटराव पवार, सुरज विटनोर, श्री रोग तज्ञ डॉ वैशाली बल्लाळ, डॉ. ऐश्वर्या आरंगळे, डॉ हर्षदा पवार,  स्टाफ नर्स अश्विनी शिंदे, प्राची चौधरी, पोपट आघाव, लॅब टेक्निशन दिपाली वाघमारे, शोभा थोरात आदी मान्यवर उपस्थित होते..
     प्रसंगी बोलताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस म्हणाले की, महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुक्यात देवळाली प्रवरा, राहुरी तसेच राहुरी फॅक्टरी येथे महिलांसाठी मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले.. त्या निमित्ताने महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, कुटुंबातील महिला निरोगी असेल तर कुटुंब सुखी राहण्यास मदत होते.. अगोदर आरोग्य महत्वाचे आहे. साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सध्या अशी शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा असे आवाहन या निमित्ताने आम्ही करत आहोत.
     प्रसंगी डॉ माने मेडिकल फाउंडेशन चे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगिळे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. ऐश्वर्या आरंगळे व डॉ हर्षदा पवार यांनी कॅम्प बद्दल सविस्तर माहिती दिली.
000
close