shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अबॅकस स्पर्धेत एल. जी. बनसुडे इंग्लिश स्कूलची घवघवीत आणि गौरवशाली कामगिरी

अबॅकस स्पर्धेत एल. जी. बनसुडे इंग्लिश स्कूलची घवघवीत आणि गौरवशाली कामगिरी                                   
इंदापूर: गोवा येथे i Champचे डायरेक्टर विशाल माने सर यांच्या आयोजनाखाली नुकतीच नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षा मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठित स्पर्धेत चार राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात वेगवान व अचूक मानसिक गणित, उत्कृष्ट एकाग्रता, स्मरणशक्ती, लॉजिकल थिंकिंग तसेच कमी वेळेत अचूक उत्तरे देण्याच्या कौशल्याच्या बळावर एल. जी. बनसुडे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
या स्पर्धेत शाळेची कु. स्वरा आकाश नगरे हिने प्रथम रनरअप मिळवत विशेष प्रशंसा मिळवली. तसेच कु. हर्षदा शरद कोळेकर, आदेश राजेंद्र कन्हेरकर, गणेश मनोज थोरात आणि राज अनिल बनसुडे यांनी द्वितीय रनरअप पटकावत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली. विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, सातत्यपूर्ण सराव आणि बौद्धिक क्षमता यामुळे हे यश शक्य झाले, असे मत परीक्षकांनीही व्यक्त केले.
या उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान चंद्रकांत कवळेकर, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व कला अकादमीचे अध्यक्ष, यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ट्रॉफी प्रदान करून करण्यात आला. यावेळी राज्य समन्वयक श्री. रमेश लवडकर यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गीता शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत (नाना) बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शीतलकुमार शहा, कार्याध्यक्षा सौ. नंदाताई (नानी) बनसुडे, सचिव श्री. ज्ञानेश्वर फुले, सहसचिव श्री. नितीन बनसुडे, प्राचार्या सौ. वंदना बनसुडे, मुख्याध्यापक श्री. राहुल वायसे, प्राचार्य श्री. संजय इंगोले तसेच मार्गदर्शक शिक्षिका उपमुख्याध्यापिका सौ. सुवर्णा वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच भविष्यातही सातत्य राखून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, अशा शुभेच्छा दिल्या.
close