कसे लिहु मी आयुष्या तुला कागदावर
प्रत्येक वेदनेला निलावात विकल्यावर
एकदा रुबरु मरना गळाभेट करुन जा
काय माहीत पुरतात कि जाळतात मेल्यावर
भावना काल माझ्याशी भांडतांना खुप रडली
जखमा गालात हसल्या निशब्द झाल्यावर
ह्या शब्दांची विरासत आकाशा एवढी झाली
धरतीचे झुंबर केले मी अंबरात पोहल्यावर
हळहळ करुन सळसळलो मी चळवळीत
कारवा होईल लोक जुडतील कविता वाचल्यावर
एक मतला दोन शेर पुरतीच उरलो आता
शब्दांचे निखारे फुटतील ह्या आकाशला जाळल्यावर
आकाश सुपारे
9822510254

