नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
दिनांक ४ ते ७ जून २०२६ या कालावधीत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी आणि केटलबेल स्पोर्ट्स इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ८ वी राष्ट्रीय केटलबेल स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धा श्री साईबाबा सांस्कृतिक भवन, शिर्डी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, नवी दिल्ली, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, कर्नाटक, उत्तराखंड आणि आसाम या राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवून आपल्या क्रीडा कौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. सब-ज्युनियर, ज्युनियर, सिनियर आणि व्हेटरन अशा विविध गटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
*संस्थेनिहाय पदकांची कामगिरी*
🔹 श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल – १० सुवर्ण, ९ रौप्य व ४ कांस्य अशी एकूण २३ पदके
🔹 श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर – ३ सुवर्ण, ६ रौप्य व ४ कांस्य अशी एकूण १३ पदके
🔹 श्री साईबाबा ज्युनिअर कॉलेज – ३ सुवर्ण अशी एकूण ३ पदके
🔹 श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय – १२ सुवर्ण, १३ रौप्य व ७ कांस्य अशी एकूण ३२ पदके
अशा प्रकारे श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील खेळाडूंनी २८ सुवर्ण, २८ रौप्य आणि १५ कांस्य अशी एकूण ७१ पदकांची भव्य कमाई करून संस्थेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव वाढविला.
🏅 *पदक विजेते खेळाडू व त्यांची कामगिरी*🏅
*श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल*
🔹 श्लोक गिते – वन आर्म जर्क, वन आर्म लॉंग सायकल व स्नॅचमध्ये ३ सुवर्णपदके (३ पदके)
🔹 आरुष बाविस्कर – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ सुवर्णपदक (१ पदक)
🔹 साई त्रिभुवन – वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक व स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 शिवम सहानी – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म जर्कमध्ये १ कांस्यपदक (२ पदके)
🔹 आर्यन दहिवाल – वन आर्म जर्कमध्ये १ रौप्यपदक व स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 ओम त्रिभुवन – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक (१ पदक)
🔹 सिद्धार्थ डांगे – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (१ पदक)
🔹 गणेश गव्हाणे – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ कांस्यपदक (२ पदके)
🔹 नक्ष महाजन – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ रौप्यपदक (१ पदक)
🔹 गिरीश पवार – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ कांस्यपदक (२ पदके)
🔹 साई शिंदे – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक (२ पदके)
🔹 साईनाथ चौधरी – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 खुशी पवार – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक (२ पदके)
*श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर*
🔹 प्राची सोनवणे – स्नॅचमध्ये १ कांस्यपदक (१ पदक)
🔹 सिद्धी पाटील – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ कांस्यपदक व स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 वेदिका वाणी – वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक व स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 अपेक्षा डांगे – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ सुवर्णपदक व स्नॅचमध्ये १ कांस्यपदक (२ पदके)
🔹 कुमुदिनी निकम – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (१ पदक)
🔹 गौरी सोनवणे – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ कांस्यपदक (१ पदक)
🔹 सायली वाणी – वन आर्म जर्कमध्ये १ रौप्यपदक (१ पदक)
🔹 आलिया शेख – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 आराध्या ढेबरे – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक (१ पदक)
*श्री साईबाबा ज्युनिअर कॉलेज*
🔹 हुजेब मणियार – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ सुवर्णपदक (१ पदक)
🔹 पवन बोडके – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक व वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक (२ पदके)
*श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालय*
🔹 ओंमकार कोल्हे – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ सुवर्णपदक व स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 पवन कुमावत – वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक, वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ रौप्यपदक व स्नॅचमध्ये १ कांस्यपदक (३ पदके)
🔹 साई चौधरी – वन आर्म लॉंग सायकल व स्नॅचमध्ये २ सुवर्णपदके तसेच वन आर्म जर्कमध्ये १ रौप्यपदक (३ पदके)
🔹 करण सातदिवे – वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ सुवर्णपदक (१ पदक)
🔹 शुभम अहिरकर – वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक व स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 लव्ह खान – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक (१ पदक)
🔹 अंकुश खान – वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ कांस्यपदक (२ पदके)
🔹 तुषार सकट – स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म जर्कमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 अनिकेत पायमोडे – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक व वन आर्म जर्कमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 साई देवकर – वन आर्म लॉंग सायकल व स्नॅचमध्ये २ कांस्यपदके (२ पदके)
🔹 सुनील जाधव – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ रौप्यपदक (२ पदके)
🔹 स्वस्तिका देशपांडे – स्नॅचमध्ये १ सुवर्णपदक तसेच वन आर्म जर्क व वन आर्म लॉंग सायकलमध्ये २ रौप्यपदके (३ पदके)
🔹 शुभांगी आव्हाड – वन आर्म जर्कमध्ये १ सुवर्णपदक, स्नॅचमध्ये १ रौप्यपदक व वन आर्म लॉंग सायकलमध्ये १ कांस्यपदक (३ पदके)
🔹 योगिता सोळसे – स्नॅच व वन आर्म लॉंग सायकलमध्ये २ सुवर्णपदके (२ पदके)
🔹 अभिषेक बच्छे – वन आर्म जर्क व स्नॅचमध्ये २ रौप्यपदके (२ पदके)
या सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम, शिस्तबद्ध सराव, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाची क्रीडा परंपरा अधिक समृद्ध झाली असून भावी पिढीतील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे, शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय अधिकारी श्री अतुल वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष औताडे, प्रा. विकास शिवगजे, मुख्याध्यापिका श्रीमती मिरजकर मॅडम, मुख्याध्यापिका कु. जगताप मॅडम तसेच मुख्याध्यापिका श्रीमती पुजारी मॅडम यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या दैदिप्यमान यशामागे क्रीडा संचालक डॉ. विक्रम सातपुते तसेच क्रीडा मार्गदर्शक श्री राजेंद्र कोहकडे, श्री कैलास शेळके, श्री सुजय बाबर आणि श्री महादू चांदे यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रभावी नियोजन व सातत्यपूर्ण प्रेरणा लाभली.
🙏 राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील गौरवशाली परंपरेत आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. खेळाडूंचा हा यशस्वी प्रवास भविष्यातही असाच तेजोमय राहो आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ते अधिकाधिक यश संपादन करून देश, राज्य व संस्थेचा गौरव वृद्धिंगत करो, हीच श्री साई चरणी प्रार्थना!

