shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चित्रपट निर्माते "काशिनाथ आव्हाड गणोरेकर" यांचा मराठी चित्रपट "कुंकू पुसलं कर्जानं" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला सिनेअभिनेत्रि अंशू राणी यांची झलक

प्रतिनिधीं पुणे स्नेहा उत्तम मडावी 
या चित्रपटामध्ये अभिनेते काशिनाथ आव्हाड गणोरेकर प्रथमच गोंधळयाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या सहनिर्मात्या जीविका सोनार असून दिग्दर्शन दाऊद बाबू शेख यांनी केले आहे. 


सहदिग्दर्शन सागर साठे व नंदा बागुल संगमनेरकर यांनी केलेले असून चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांनी या चित्रपटात काम केलेले आहे. ज्यामध्ये प्रकाश धोत्रे (बाळूमामा फेम), उज्वला पाटील, समृद्धी गटकळ, सेजल सातपुते, प्रसाद कोळी, प्रज्ञा गोपाळे सिनेअभिनेत्रि अशुराणी इत्यादी सहकलाकांनी काम केलेले आहे. चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचे काम ऑरेंज म्युझिक स्टुडिओ, नाशिक येथे पार पडलेले आहे. काळजाचा ठाव घेणार कौटुंबिक आणि भावनिक चित्रपट "कुंकू पुसलं कर्जानं" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे, निर्माते काशिनाथ  आव्हाड गणोरेकर यांनी सांगितले._
close