shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार -भाग्यश्री पाटील यांची माहिती •हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन -दिल्ली येथे 22 सप्टेंबरला वितरण.

नीरा भीमा कारखान्यास राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 
-भाग्यश्री पाटील यांची माहिती
 •हर्षवर्धन पाटील यांचेकडून अभिनंदन 
-दिल्ली येथे 22 सप्टेंबरला वितरण.
इंदापूर : प्रतिनिधी दि.11/9/26
                                    शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली यांचा गाळप हंगाम सन 2025-26 साठीचा राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी शुक्रवारी ( दि. 11) दिली. दरम्यान, या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  सर्वांचे अभिनंदन केले आहे.
      नीरा-भीमा कारखान्यास सदर गळीत हंगामामध्ये सर्वच उत्कृष्ट तांत्रिक पॅरामीटरमुळे हा राष्ट्रीय कार्यक्षमतेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम हा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम होता. या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामामध्येच देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याने, कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे त्यांनी सांगितले.
    या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतकांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दि.  22 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी दिल्ली संपन्न होणार आहे. कारखान्यास आजपर्यंत राज्य व देशपातळीवरील एकूण 13 पुरस्कार मिळाले आहेत, अशी माहितीही यावेळी अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अँड.कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.
______________________________
फोटो- हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील
close