*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन फार्मा व्हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न*
इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडीमध्ये दि. 5 ऑक्टोबर 2026 रोजी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन फार्मा व्हॉलीबॉल व थ्रोबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतील विविध फार्मसी महाविद्यालयांच्या मुला-मुलींच्या संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉलचे १९ संघ व थ्रोबॉलचे १६ संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेदरम्यान व्हॉलीबॉल व थ्रोबॉलचे एकूण ४० सामने खेळविण्यात आले.
स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. या आयोजनामुळे विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची, सांघिक भावना जोपासण्याची आणि विविध महाविद्यालयांतील खेळाडूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, औसा, लातूर आणि एस. व्ही. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी या संघांमध्ये रंगला. या चुरशीच्या अंतिम सामन्यात श्रीलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर या संघाने विजय मिळवून राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले.
मुलींच्या थ्रोबॉल स्पर्धेचा अंतिम सामना विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडी आणि एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, इंदापूर या संघांमध्ये झाला. या अंतिम सामन्यात विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडीच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय मिळवला आणि राज्यस्तरीय विजेतेपदाचा चषक आपल्या नावावर केला.
स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बेस्ट स्मॅशर, बेस्ट थ्रोअर, बेस्ट अटॅकर आणि प्लेअर ऑफ द सिरीज या वैयक्तिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना प्रमाणपत्रे व पदके देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, लाखेवाडीच्या वतीने आयोजित, या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळते अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळ खेळलेत तर आरोग्य चांगले राहते, शिवाय शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते व आरोग्य चांगले राहते असे अनमोल मार्गदर्शन स्पर्धकांना संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद सदस्य ,गटनेते श्रीमंत ढोले सर यांनी केले.
या कार्यक्रमास सिडकोचे सहसचिव दिलीप ढोले, जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्त सौ.सुजाता ढोले, जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष डॉ. चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव, विश्वस्त पृथ्वीराज ढोले ,सहसचिव ऋषिकेश ढोले,अक्षदा ढोले- पाखरे तसेच विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर, विद्या निकेतन स्कूलचे प्राचार्य गणेश पवार, विद्या निकेतन इंजिनियरिंग कॉलेज चे प्राचार्य आशिष जोशी, सीबीएसई स्कूल चे प्राचार्य सरगर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणी याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापकवर्ग, आयोजन समितीचे सदस्य व स्वयंसेवकांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

