shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/

About Me

पत्रकारितेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही अल्ताफ शेख यांचे मोठे भरीव योगदान

हिवरगांव आंबरे येथील जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास पुस्तकांचे वाटप

दै.कॉमन न्यूज चे संपादक अल्ताफ शेख यांचा स्तुत्य उपक्रम; इ.पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

अकोले / प्रतिनिधी:
दिवाळी म्हटली की आनंद,उत्साह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण, मात्र याच सणाच्या आनंदात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून तालुक्यातील हिवरगांव आंबरे येथे एक स्तुत्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. दैनिक कॉमन न्यूज चे संपादक ज्येष्ठ पत्रकार अल्ताफ शेख यांच्या वतीने हिवरगांव आंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका ठुबे मॅडम यांनी विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहावा, सुट्टीचा सदुपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाची उजळणी करता यावी, या सकारात्मक उद्देशाने संपादक अल्ताफ शेख यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीच्या काळात विद्यार्थ्यांच्या हातात केवळ भेटवस्तू न देता ज्ञानाची शिदोरी देण्याचा त्यांचा हा प्रयत्न उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरला.

काही अपरिहार्य कारणांमुळे संपादक अल्ताफ शेख यांना या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. मात्र, त्यांच्या वतीने त्यांचे बंधू शौकत शेख, चिरंजीव मुजीब शेख तसेच मित्रपरिवाराने शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास पुस्तकांचे वाटप केले. त्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमाला सरपंच मेंगाळ, शालेय विकास समितीचे माजी अध्यक्ष सहदेव कोळगे, स्वामी समर्थ केंद्राचे नामदेव कदम, डॉ. सतीश बोंबले, भाऊसाहेब बोंबले, नंदकुमार देशमुख, विशाल कदम, अमित बिडवे, अनिकेत माळी, माधव वाकचौरे, संजय कोळगे, रूटीश कर्डिले यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका ठुबे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती. सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना अभ्यास पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापिका ठुबे मॅडम यांनी दैनिक कॉमन न्यूज चे संपादक अल्ताफ शेख यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा विचार करून त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच प्रेरणादायी आहे. समाजातील विविध घटकांनी शिक्षण क्षेत्रासाठी आपापल्या परीने योगदान दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध होऊ शकतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी अल्ताफ शेख यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचेही कौतुक केले.

*पत्रकारितेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही सामाजिक परिवर्तनाचा ध्यास*

पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील प्रश्न मांडणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, जनजागृती करणे आणि समाजाला सकारात्मक दिशा देणे हीदेखील पत्रकारितेची महत्त्वाची जबाबदारी आहे. याच विचारातून दैनिक कॉमन न्यूज चे संपादक अल्ताफ शेख हे पत्रकारितेबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही आपले योगदान देत आहेत.

समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवायचे असेल, तर शिक्षणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे, या विचारातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रश्न आपल्या सामाजिक कार्याच्या केंद्रस्थानी ठेवला आहे. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत व्हावा, त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक प्रगतीची समान संधी मिळावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.

विशेषतः शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, अभ्यासाची गोडी निर्माण करणे आणि शिक्षक व पालकांमध्ये शैक्षणिक जागरूकता वाढविणे, या दिशेने त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडतानाच प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

*पुस्तकांची भेट म्हणजे उज्ज्वल भविष्याची पायाभरणी !*

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य आणि योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा अभ्यास खंडित होऊ नये, या उद्देशाने देण्यात आलेली अभ्यास पुस्तके विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.

विशेष म्हणजे, स्वतः कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसतानाही आपल्या बंधू शौकत शेख, मुलगा मुजीब शेख आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वी करून अल्ताफ शेख यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.

दिवाळीत दिलेल्या भेटवस्तूंचा आनंद काही दिवस टिकतो; मात्र विद्यार्थ्यांच्या हातात दिलेले पुस्तक त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. याच सकारात्मक विचारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजातील इतरांनीही प्रेरणा घेण्यासारखा आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार घेणारे दैनिक कॉमन न्यूजचे संपादक अल्ताफ शेख, त्यांच्या वतीने हा उपक्रम यशस्वी करणारे शौकत शेख व मुजीब शेख, तसेच या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

"समाज बदलायचा असेल तर विचार बदलले पाहिजेत, विचार बदलायचे असतील तर शिक्षणाला बळ दिले पाहिजे आणि शिक्षणाला बळ देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान दिले पाहिजे, हाच संदेश या उपक्रमातून देण्यात आला."

*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close