हे पहा परमेश्वराची लिला आनंदी ह्या गोमातेचे चमत्कार,कोणीही तुळशी बी न टाकता आपोआप आनंदी गोमातेच्या समाधीवर तुळशीमाता खुप दाट उगवली आहे व ऐन उन्हाळ्यातही हिरवेगार झाले आहे यालाच दैवी चमत्कार म्हणतात.आणि तुळशीमाता म्हणजे जगातील एकमेव सर्वात पवित्र झाड आहे,त्यामुळेच घरासमोर पावित्र्याचा नेहमी सहवास असावा म्हणून तुळशीचे झाड म्हणजे (तुळशी वृंदावनात) झाड लावतात.तुळशीचे महत्व आणि पावित्र्य महान ग्रंथात सांगितले आहेच म्हणून प्रत्येक सप्ताह काळात तुळशीमाता असल्याशिवाय सप्त्याला अर्थच रहात नाही.म्हणून आनंदी गोमातेला प्रत्येकाने दररोज वंदन करावे,आपले चांगल्या विचाराला चालना नक्कीच मिळेल.आपले कल्याण झाल्याशिवाय रहाणार नाही.तसा प्रत्येकाने मनोभावे सेवा करावी व आपला उद्धार करून घ्यावे.
"जय आनंदमाई,जय आनंदी गोमाता


