shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भाकर

देवा! माझा हा संसार 
मांडला मी भुई वर
मातीचच आंथरून
आभाळाचे पांघरूण.
उपाशीच रोज आम्ही
नाही कुणाचा आधार
चिंता मला या पिल्यांची
आणू कोठून भाकर.
घर दार बंद सारी
पोटात होतेया लाही
कधी मिळे अन्न कधी
बाळे राहत उपाशी.सांग देवा आता काही
काय तुझा आहे न्याय
सारी लोकं म्हणताती
तू या विश्र्वाची रे माय.या वेलीच्या संसारास
नाही काडीचा आधार
कुठे हिंडू आता सांग
कुणी मिळेल? दाता र.अंगाला नाही कापड
मुलं उन्हानं तापली
का अशी आमची गत
नाळ जगाने कापली.जगावर महामारी
आम्हाही उपासमारी
देवा टळो ही रे पिडा
तूच जगाचा कैवारी.
मच्छिंद्रनाथ शामराव धनवटे.

तालुका पैठण,जी. औरंगाबाद.
Mo 9767480864.
close