shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रविवारी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चैनल चा पाचवा वर्धापन दिन सोहळा होणार संपन्न.

रविवारी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चैनल चा पाचवा वर्धापन दिन सोहळा होणार संपन्न.
इंदापूर : दि. 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 4 वाजता राधाई लॉन्स वाघ पॅलेस येथे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चा 5 वा वर्धापन दिन सोहळा व आदर्श पुरस्कार प्रदान सोहळा  खासदार सुप्रिया सुळे , कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे  अध्यक्ष 
 हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा परिषद  आरोग्य व बांधकाम माजी सभापती प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखानाचे चेअरमन पृथ्वीराज जाचक, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना चे व्हाईस चेअरमन भरत शहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते राहुल मखरे,पोलीस उपाधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड, इंदापूर तहसीलदार जीवन बनसोडे, उपअभियंता सरकारी बांधकाम विभाग इंदापूर सुरेश दुबाले, इंदापूर नगरपालिका मुख्याधिकारी रमेश ढगे, इंदापूर पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, इंदापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन खुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर या आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती जनता एक्सप्रेस मराठी न्युज चे संपादक श्रेयस नलवडे,उपसंपादक संतोष तावरे, पत्रकार बापू बोराटे, एडिटर क्षितिज मोरे यांनी दिली.
 तसेच ते पुढे म्हणाले की,विविध क्षेत्रातील आदर्श पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये  डॉ. तेजस हंगे यांना (आदर्श पशुवैद्यकीय अधिकारी), डॉ. श्रेणिक शहा यांना (आदर्श डॉक्टर),विधीतज्ञ गिरीश शहा यांना (आदर्श कायदे तज्ञ), उद्धव नारायण नागपुरे यांना (आदर्श लालपरीसेवक), दत्तात्रेय व्यवहारे सर यांना (आदर्श क्रीडा प्रशिक्षक), दत्तात्रेय घोगरे यांना (आदर्श पाणी व्यवस्थापक), शेटफळ हवेली (आदर्श ज्येष्ठ नागरिक), लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन ला (आदर्श सामाजिक संस्था), शुभांगी पांडुरंग बरळ (आदर्श महिला शेतकरी), अक्षय भारत माळी (आदर्श युवा शेतकरी), नवनाथ गायकवाड यांना (आदर्श प्रयोगशील शेतकरी), जयंत नायकुडे सर यांना (आदर्श सेवा पुरस्कार),दत्तात्रेय अनपट सर यांना (आदर्श योग प्रशिक्षक), सागर मिसाळ यांना (आदर्श जनसेवक), देशपांडे व्हेज यांना (आदर्श हॉटेल व्यवसाय), गुरुकुल विद्या मंदिर गोखळी यास (आदर्श शिक्षण संस्था) या मान्यवरांना आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
close