बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयात हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
इंदापूर : श्री शिवाजी विद्यालयाच्या संकुलामध्ये २१ ऑगस्ट रोजी मा.सहकार व संसदीय कार्यमंत्री,राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तसेच श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष.हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव घोगरे हे होते.
यावेळी प्रमुख मान्यवरांचा सन्मान तसेच व्यासपीठावर सर्वांचा सन्मान करण्यात आला.तसेच विद्यार्थ्यांच्या समवेत मान्यवरांच्या शुभहस्ते केक कापण्यात आला.
.हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन करण्यात आले. ह्या शिबिरात १४६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. .हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच अखिल भारतीय मराठा साहित्य परिषदेच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.सौ.दीप्ती दिनेश पाटील मॅडम यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक .मनोजर पाटील, उपाध्यक्ष श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन भाऊंनी समाजकारण केले. सुरुवातीला सहकार महर्षी कारखान्याचे संचालक झाले. त्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य झाले.त्यानंतर जिल्हा दूध संघाचे संचालक झाले.1995 साली आमदार व मंत्री झाले.काळेश्वर देवस्थान असो विठ्ठल रुक्मिणी देवस्थान असो पद्मावती देवस्थान असो, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी असो सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी काम केले. गावाचा विकास व तालुक्याचा विकास करून आपली वाटचाल केली.. त्यांनी भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
.उदयसिंह पाटील संचालक, निरा भिमा सहकारी साखर कारखाना यांनी आपल्या मनोगतात लहान मुलांसाठी भाऊंचा आशीर्वाद मोलाचा असल्याचे मत व्यक्त केले.ज्या माणसांमध्ये कर्तुत्व असते तो माणूस संघर्षातून पुढे आलेला असतो.आता भाऊ राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आहेत.भविष्यात हे बावड्याचे सुपुत्र वरिष्ठ पदावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.श्री शिवाजी विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे, त्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा सन्मान झाला. त्यामध्ये सौ. दीप्ती दिनेश पाटील मॅडम,.गुजर एम.पी.सर सौ.भोसले डी.यु. मॅडम व प्राचार्य श्री घोगरे डी आर सर यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रम प्रसंगी कामधेनू सेवा परिवाराचे अध्यक्ष ह भ प डॉ.लक्ष्मणराव आसबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या मनोगतात महामानवांच्या आयुष्यातील दुःखांची आठवण करून दिली हर्षवर्धन पाटील यांनाही आपल्या आयुष्यात अनेक वेळा दुःख झाले. भाऊंना अनेक पदे मिळाली आम्ही भाग्यवान आहोत आमचा जन्म भाऊंच्या गावात झाला. जी माणसं जगासाठी काम करतात समाजासाठी काम करतात त्या सगळ्या कामांमध्ये त्यांच्या कुटुंबाचा त्याग असतो भाऊंच्या मोठे होण्यामागे गावाचा तसेच कुटुंबाचा मोठा त्याग आहे हे विसरून चालणार नाही मी परमेश्वराला विनंती करतो की बावडा गावचे हे नेतृत्व त्यांची शंभरी पूर्ण होऊन आम्हाला याच ठिकाणी शंभरावा वाढदिवस साजरा करण्याची संधी द्यावी आणि भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सूर्याप्रमाणे तळपत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
.अशोकराव घोगरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मी विरोधात काम करत असतानाही माझ्या शाळेला निधी देण्याचे काम भाऊंनी केले. आता राजकारणात समाजकारण राहिले नाही.इंदापूरच्या लोकांना चांगले नेतृत्व कोणते आणि कोण चांगलं काम करतो हे निश्चितपणे कळेल असे ते म्हणाले. भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना चार हजार केकचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव किरण पाटील, सुधीर पाटील, विकासराव पाटील, अनिल पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, उपसरपंच रणजीत घोगरे, रणजीत गिरमें, यशवंत सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ बागल उपाध्यक्ष म नामदेवराव घोगरे, रुग्णालय पतपेढीचे व्यवस्थापक धीरज पाटील, प्राचार्य घोगरे डी आर सर,उपप्राचार्य हासे सर, पर्यवेक्षक व्यवहारे सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विराज मोहिते सर, रत्नप्रभादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य लहुजी वावरे सर, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक घोगरे एस.डी. सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विनायक गुरव सर,विविध संस्थांचे पदाधिकारी व सहकारी ग्रामस्थ-पालक उपस्थित होते.
यावेळी सर्व अध्यापक अध्यापिका इतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पवनराजे घोगरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .मुलाणी एस.टी.सर यांनी केले.