shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इडा पिडा तळो, बळीचं राज्य येवो!

इडा पिडा तळो, बळीचं राज्य येवो!

धरणगाव प्रतिनिधी -- तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी जळगाव यांना गिरणेचे आवर्तन सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले होते, अखेर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी निसर्गाला शेतकऱ्यांची दया आली. शेतकरी अतिशय हवालदिल झालेला होता, अर्धा हंगाम डोळ्यादेखत नामशेष झाला. पोटच्या पोरांप्रमाणे जीव लावलेली पीके नष्ट होतांना बघून अतीव वेदना त्या शेतकरी बापाने अनुभवल्या. शासन प्रशासन यांनी दखल घेऊन गिरणेचे आवर्तन सोडले असते त्याचा लाभ त्या क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना झाला असता परंतु काल रात्री दहा वाजेनंतर मुसळधार पावसाला सुरवात झाली. अखेरीस गतप्राण झालेल्या जीवांना पुन्हा एकदा नवी उमेद मिळाली आणि आशेची पालवी फुटली. माणसाच्या समूळ वेदनेचे कारण अपेक्षा आहे जोपर्यंत अपेक्षा असतात तोपर्यंत व्यक्ती सुखी होऊ शकत नाही. कालच्या पावसानंतर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या की हाच पाऊस पंधरा दिवसांपूर्वी आला असता तर किती बरं झालं असतं परंतु सर्वच मनासारखं होत नाही हेच अंतिम सत्य आहे. किमान काही प्रमाणात का होईना शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला हे मात्र नक्कीच. पीके येणार नाहीत किंवा काही प्रमाणात येतील परंतु मुक्या जीवांच्या चारा पाण्याचा प्रश्न तरी सुटण्यास मदत होईल. ज्याप्रमाणे निसर्गाला शेतकऱ्याची दया आली त्याप्रमाणे शासनाने देखील प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती कारण...

"जो नेहमी उपाशी त्याला शेतकरी म्हणायचं, ज्याचा धोंडा उशाशी त्याला शेतकरी म्हणायचं, सावकार ज्याला नाडतो त्याला शेतकरी म्हणायचं, निसर्ग ज्याला गाडतो त्याला शेतकरी म्हणायचं, जो स्वतःला टांगून घेतो त्याला शेतकरी म्हणायचं, सर्वच जर टांगून घेतील तर आपण शेतकरी कोणाला म्हणायचं"

              रमी सर्कलवर रमी खेळण्या इतपत शेतकऱ्याचं जीवन नक्कीच सोप्प नाहीये. शेतकरी तर असा जुगारी आहे जो फक्त निसर्गाच्या भरोस्यावर आयुष्याचा जुगार खेळतो ज्या जुगाराचा परिणाम कसाही आला तरी हा जिगरबाज मागे हटत नाही. काळ्या आईच्या सेवेसाठी तो समर्पित भावनेने सतत कार्यरत असतो. आपला बळीराजा संकटात आहे त्याला साथ देणं गरजेचं आहे कारण, "शेतकरी सुखी तर जग सुखी". 

               लेखनप्रपंच

            लक्ष्मणराव पाटील

शहराध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव

close