प्रकाश मुंडे /बीड जिल्हा प्रतिनिधी :- कृषी विभाग ,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), उमेश तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष केज, यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव 2025 याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केज तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अंकुश रावजी इंगळे ,उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर ,तहसीलदार श्री राकेश गिड्डे ,गटविकास अधिकारी श्रीमती दिवाने मॅडम ,तालुका कृषी अधिकारी श्री पठाडे साहेब ,गटशिक्षणाधिकारी श्री बेडस्कर साहेब ,महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख श्रीमती लटपटे मॅडम, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव रावजी सूर्यवंशी ,श्री सुदाम पाटील, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल गदळे ,सरचिटणीस सुनील घोळवे ,अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष खदीर कुरेशी ,लिंबराज फरके ,केज तालुक्यातील शेतकरी बचत गटाच्या महिला व पंचायत समिती व कृषी कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते .
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सांगितले की सध्याच्या काळात माणसाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रानभाज्यांची आवश्यकता आहे तसेच उपसभापती डॉ वासुदेव नेहरकर यांनी रान भाज्याचे महत्त्व सांगताना त्यामध्ये शरीरासाठी लागणारे औषधी गुणधर्म असणारे विटामिन्स पोषक अन्नद्रव्य असल्याने हे माणसाच्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात व रानभाज्या ह्या पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्या निसर्गामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या असणाऱ्या असतात परंतु त्यामधील औषधी गुणधर्म माहीत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते व त्या आहारात घेतल्या जात नाहीत तरी या अभियानाच्या माध्यमातून या रानभाज्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म त्याचे मानवी शरीराला असलेला उपयोग याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे यासाठी रानभाजी महोत्सव हा एक दिवस साजरा न करता त्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करून या रानभाज्या शरीरासाठी व आरोग्यासाठी कशा उपयोगी आहेत याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती केज यांच्याकडून सर्व त्या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आले. रानभाज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे त्यांच्यावर कुठलेही रोग पडत नाहीत त्यांच्यावर रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी केलेली नसते रानभाज्या या पूर्णपणे नैसर्गिक असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जनतेने रान भाज्यांचा वापर रोजच्या आहारात उपयोग करावा असे डॉ .वासुदेव नेहरकर यांनी सांगितले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक तहसीलदार श्री राकेश गिड्डे यांनी केले .यावेळी परिसरातील शेतकरी व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.