shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै भाऊसाहेब (अण्णा) गोंदकर यांचे निधन


शिर्डी प्रतिनिधी :        
शिर्डी येथील दानशूर व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेन्द्र भाऊसाहेब गोंदकर यांचे वडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहाता तालुका संघ चालक श्री रावसाहेब मुरलीधर गोंदकर पा. यांचे जेष्ठ बंधू, भारतीय किसान संघाचे व वारकरी संप्रदायातील अखंड कार्यरत असणारे कै. भाऊसाहेब ( अण्णा ) मुरलीधर गोंदकर ( वय ७६) यांचे दि. १० आ़गस्ट २०२५   पहाटे निधन झाले. त्यांच्या अंतविधी साठी प्रचंड प्रमाणात गोंदकर कुटुंबियांवर प्रेम करणारे मान्यवर उपस्तिथ होते आणि काही लोक त्यांच्या अंत्यविधी साठी येऊ न शकल्याने काल संध्याकाळी  विधानसभेचे सभापती श्री राम शिंदे यांनी सांत्वन पर राजेंद्र गोंदकर यांचे घरी येऊन भेट दिली. तसेच माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, डॉक्टर राजेंद्र पिपाडा, आमदार विठ्ठलराव लंघे नितीन दिनकर माजी खासदार सुजय विखें यांनी ही याप्रसंगी भेट देत सांत्वन केले. 


यावेळी जिल्ह्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.माजी शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, शहराध्यक्ष रविंद्र गोंदकर, उपाध्यक्ष अशोक पवार,ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष भारत शिंदे ,सचिन तांबे किरण बोराडे, योगेश गोंदकर, राजेश शर्मा, टकाजी काटकर, हिम्मतराव होळकर, पत्रकार पंढरीनाथ पगार पत्रकार संजय महाजन व असंख्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते    कैलासवासी भाऊसाहेब गोंदकर यांच्या पाठीमागे त्यांचे बंधू रावसाहेब पाटील गोंकार पत्नी सौ पुष्पां भाऊसाहेब गोंदकर मुलगा राजेंद्र गोंदकर विक्रम गोंदकर बहीण शशिकांत पाराजी गव्हाणे मुलगा अशोक भाऊसाहेब गोंदकर पुतणे धनंजय रावसाहेब गोंदकर माजी नगरसेविका वंदना गोंदकर यांचे ते सासरे होत तसेच नातवंड असा परिवार आहे कैलासवासी भाऊसाहेब पाटील गोंदकर यांचा दहावा दिनांक १९/०८/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता श्री कृष्ण मंदिर नांदुर्खी पाटावर होणार आहे  .
close