सामाजिक कार्यातील योगदानाची दखल;समाजात आनंदाचे वातावरण...
नाशिक (प्रतिनिधी) – नॅशनल धोबी महासंघ यांच्या वतीने सौ. रेखा भगवान मोरे यांची नाशिक शहर महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यातील त्यांचे सक्रिय योगदान, संघटनात्मक कौशल्य आणि माध्यमांशी असलेला उत्तम संवाद याची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या निवडीमुळे धोबी समाजात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सौ. मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नाशिक शहर व परिसरातील विविध सामाजिक, राजकीय तसेच संस्थात्मक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
नॅशनल धोबी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे की, सौ. रेखा मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची कार्यक्षमता अधिक बळकट होईल आणि समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल. त्यांच्या नेतृत्वातून समाजातील महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक ऐक्य यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल नॅशनल धोबी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. अनिलजी एस. मोरे साहेब व संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख श्री. गुलाबराव जगन्नाथ भदाणे (जळगाव, महाराष्ट्र) यांनी सौ. मोरे यांचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.