तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन साजरी
माझे पोलीस भाऊ सर्व सण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सदैव उभे राहून आपले रक्षण करतात.- अनिताताई खरात.
इंदापूर : प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राख्या बांधून तेज पृथ्वी ग्रुपचे अध्यक्ष अनिताताई खरात यांनी रक्षाबंधन केली साजरी.
या वेळी अनिताताई खरात म्हणाल्या की, सर्वजण प्रत्येक सणाला सुट्टी घेऊन आपल्या घरी कुटुंबासमवेत सण साजरे करतात. परंतु माझे पोलीस भाऊ सर्व सण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी सदैव उभे राहून आपले रक्षण करतात. म्हणून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षीच पोलीस स्टेशन येथे अतिशय उत्साहात रक्षाबंधन सण साजरा केला जातो.आणि याही वर्षी रक्षाबंधनाचा सण पोलिस स्टेशनला सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून साजरा करण्यात आला.
आमच्या पोलिस भावांनी माझ्या महिला भगिनीच्या पाठीशी सदैव असेच खंबीरपणे उभे राहावे तसेच आमच्या बहिणींचे प्रेमाचे बंधन आमच्या पोलीस भावांना सदैव बळ देऊ त्यांचं आयुष्य सुखी समृद्ध होवो याच रक्षाबंधनाच्या आमच्या भावांना शुभेच्छा.