*नैसर्गिक पाना फूलांच्या राख्या
बांधून राखी पोर्णीमा केली साजरी .
वृक्ष संजिवनी परिवाराचा पर्यावरण पुरक अनोखा उपक्रम .*
इंदापूर : वृक्ष संजिवनी परिवाराने रक्षाबंधन दिना निमित्त जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी विसावा स्थळ येथे नैसर्गिक पानाफुलां पासून तयार केलेल्या राख्या झाडांना बांधून वृक्ष संजिवनी परिवाराने पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
यावेळी संयोजिका सायरा आत्तार
चंद्रकांत देवकर, अशोक अनपट
हमीद आत्तार व प्रशांत गिड्डे व वृक्षमित्र उपस्थित होते .