धरणगाव प्रतिनिधी -
धरणगाव : धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रोजी साळवा-साकरे "गाव तेथे राष्ट्रवादी" संपर्क अभियान उत्साहात संपन्न झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांचा विचार घराघरात पोहचविण्यासाठी "गाव तेथे राष्ट्रवादी" संपर्क अभियानांतर्गत पक्षाची विचारधारा, पक्ष संघटन व पक्षाची बांधणीसाठी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी समतेचे प्रतिक पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून सुरू केलेले साळवा-साकरे जि.प. गटातील बांभोरी, भवरखेडे, बोरगाव, जांभोरा, सारवे, बाभळे, धानोरा, गारखेडा, भोणे, रोटवद, नांदेड, साळवा, निशाणे, पिंपळे या गावातील जुने जाणते निष्ठावंत सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे कृषी विषयक धोरण, शैक्षणिक धोरण, महिला धोरण, सुशिक्षित युवक यांसह लोकहिताचे तसेच समाजोपयोगी निर्णयांची माहितीचा प्रचार प्रसार करून पक्षाचा विचार पोहचविला. या अभियान दरम्यान "गाव तेथे राष्ट्रवादी" संपर्काच्या माध्यमातून मतदार संघातील प्रश्नांचे देखील अवलोकन केले आणि पक्षाच्या वाढविस्तारासाठी साळवा-साकरे गटानंतर पिंप्री-सोनवद, पाळधी-चांदसर गटात अभियान राबविण्यात येणार असल्याचे सौ. पाटील यांनी व्यक्त केले.
संपर्क अभियानाला बांभोरीचे धर्मा आबा, अशोक पाटील, भवरखेड्याचे भाईदास पाटील, संभाजी आबा, रविंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, बोरगावचे अनिल पाटील, पुरुषोत्तम पाटील, नरेंद्र पाटील, गोरख पाटील, जांभोऱ्याचे विनायक पाटील, परेश गुजर, सुनिल गुजर, रमेश सपकाळे, सारवेचे रघुनाथ रामराव पाटील, जितेंद्र अहिरे, नाना मरसाळे, ईश्वर भिल, बाभळ्याचे वाल्मिक पाटील, रावा तात्या, गारखेड्याचे किशोर पाटील, धानोऱ्याचे गणेश महाजन, रवि महाजन, भोणेचे मकरध्वज पवार, सुनिल पाटील, रोटवदचे दिपक पाटील, नांदेडचे राजेश अत्तरदे, बाळू भारंभे, किरण सोनवणे, साळवेचे राजाराम गुरुजी, श्रावण गुरुजी, दिलीप बापू, कपिल पाटील, निशाणेचे सुभाष पाटील, समाधान पाटील, पिंटू पाटील, पिंपळेचे तुकाराम पाटील, समाधान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोनू पाटील, जिजाबराव पाटील, गणेश पाटील, सुरेश पाटील, प्रकाश रणसिंग, काशिनाथ रणसिंग, संजय रणसिंग, रविंद्र रणसिंग, सुहालाल मोरे, शांताराम मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व जुने जाणते सहकाऱ्यांशी भेट घेत पक्ष संघटने बाबत चर्चा झाली. या संपर्क अभियानप्रसंगी तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, एकनाथ पाटील, मोहीत पवार, जेष्ठ नेते नारायण चौधरी, ओंकार माळी, राजू धनगर, नंदू धनगर, सुरेश महाजन, रोटवदचे भैय्या पाटील, पी डी नाना, भगवान शिंदे, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साळवा-साकरे संपर्क अभियानाच्या सांगता प्रसंगी शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी व्यक्त केले की, देशाचे माजी कृषिमंत्री, पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षातून लाखाहून अधिक कार्यकर्ते हे नेते झालेले आपण पाहिले असून सर्वश्रुत आहे, म्हणूनच येणाऱ्या काळात पक्ष संघटन करून पवार साहेबांचे हात बळकट करून निश्चितच लाखो नेत्यांची फौज तयार होईल, असा विश्वास धरणगाव शहराध्यक्ष श्री. पाटील यांनी व्यक्त केला. तद्नंतर धरणगाव तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले की, साळवा-साकरे जि.प.गटातल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी/युवकांनी गाव खेड्यात असलेल्या गावकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी गावागावातून पक्षाच्या शाखा काढून सक्रिय व्हावे आणि या शाखांमार्फत युवकांच्या तसेच समाजातील विविध प्रश्नांवर आक्रमक आणि विधायक काम करून पक्ष संघटना वाढवावी, असे आवाहन (साळवा- साकरे गट) "गाव तेथे राष्ट्रवादी" अभियानाच्या सांगता प्रसंगी तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.