shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीचा स्तुत्य उपक्रम; गुढीपाडव्यानिमित्त शिर्डीत भव्य शिधा वाटप


मा. सौ. धनश्रीताई विखे यांच्या शुभहस्ते होणार शुभारंभ; शिर्डीत दिग्गज मान्यवरांची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मांदियाळी

शिर्डी प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
मराठी नववर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याच्या (२०२६) मंगल पर्वावर 'श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी' यांच्या वतीने एका भव्य शिधा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्तुत्य उपक्रम सोमवार, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ०६.०० वाजता 'साईउद्यान इमारत परिसर' येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व शुभहस्ते वाटप:
या समाजोपयोगी कार्यक्रमाचा शुभारंभ रणरागिणी महिला मंडळ, लोणीच्या अध्यक्षा मा. सौ. धनश्रीताई विखे मॅडम यांच्या शुभहस्ते होणार आहे.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्षजी गाडीलकर साहेब (भा.प्र.से.), शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. जयश्रीताई थोरात मॅडम, शिर्डी नगरपरिषदेचे उप नगराध्यक्ष मा. श्री अभयभैय्या शेळके पा., साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री भिमराजजी दराडे साहेब आणि राहाता येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक मा. श्री नामदेवजी ठोंबळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत.
साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती:
या कार्यक्रमाला श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे अनेक महत्त्वाचे अधिकारी देखील उपस्थित राहून शोभा वाढवणार आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता तथा प्रशासकीय अधिकारी मा. श्री बी. डी. दाभाडे साहेब, प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी मा. श्रीमती मंगल वराडे मॅडम, प्रशासकीय अधिकारी मा. श्री संदिपकुमारजी भोसले साहेब, प्रशासकीय अधिकारी मा. श्रीमती प्रज्ञा महांडुळे मॅडम, संरक्षण अधिकारी तथा पोलीस निरीक्षक मा. श्री रोहिदासजी माळी साहेब आणि प्रशासकीय अधिकारी मा. श्री अतुलजी वाघ साहेब यांची सन्मानीय उपस्थिती असणार आहे.

आयोजक व संचालक मंडळाचे परिश्रम:
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 'श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी' चे संपूर्ण संचालक मंडळ विशेष परिश्रम घेत आहे. संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल तुकाराम पवार पा. आणि व्हाईस चेअरमन श्री पोपट भास्कर कोते पा. यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे.

यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य जातीने हजर राहणार असून त्यामध्ये संचालक श्री महादु बापु कांदळकर, श्री कृष्णा नाथा आरणे, श्री भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., श्री संभाजी शिवाजी तुरकणे पा., श्री देविदास विश्वनाथ जगताप, श्री विनोद गोवर्धन कोते पा., श्री मिलींद यशवंत दुनबळे, श्री तुळशिराम रावसाहेब पवार पा., श्री रविंद्र बाबु गायकवाड, श्री भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., श्री इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप पा., संचालिका सौ. लता मधुकर बारसे पा., संचालक श्री रंभाजी काशिनाथ गागरे आणि तज्ञ संचालक श्री भाऊसाहेब भानुदास लबडे पा. यांचा समावेश आहे.

याचबरोबर या व्यवस्थेचे कामकाज पाहणारे संस्थेचे सचिव श्री विलास गोरखनाथ वाणी पा., सह सचिव श्री बाबासाहेब शंकर अनर्थे पा. आणि सहाय्यक सह सचिव श्री संभाजी सोपान कोते पा. हे देखील उपस्थित राहणार आहेत.
गुढीपाडव्याच्या या पवित्र मुहूर्तावर आयोजित केलेल्या या शिधा वाटप कार्यक्रमाचे शिर्डी शहर आणि पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

close