प्रतिनिधी :मोहन शेगर, सोनई
*सोनई :* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीड अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय लॉन टेनिस स्पर्धा वार बुधवार दिनांक १६/०९/२०२६ रोजी नगर क्लब, अहिल्यानगर या ठिकाणी पार पडल्या संपूर्ण जिल्ह्या मधून विविध शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये आपल्या सुजाता इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी सूर्या कमलेश काकडे १९ वर्ष मुले या वयोगटात जिल्ह्यात प्रथम आला असून त्याची निवड विभागीय स्तर स्पर्धेसाठी झाली आहे.
त्याला मिळालेल्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्याचे कौतुक होत आहे. त्याने संपादन केलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरणजी सोनवणे सर, प्राचार्या ज्योती सोनवणे मॅडम, व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
०००

