shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टलचा आज शुभारंभ!

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टलचा आज शुभारंभ!
इंदापूर : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ भरणेवाडी तालुका इंदापूर येथे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला.
यावेळी कृषी मत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या या योगदानाला अधिकृत ओळख मिळावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या माध्यमातून राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळणार असून, कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, महिला शेतकरी म्हणून मान्यता देताना केवळ जमिनीची मालकी हा निकष न ठेवता शेतीतील प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. पिकांची लागवड, बीजोत्पादन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, मधुमक्षिकापालन, फलोत्पादन, पुष्पोत्पादन यांसह विविध शेती व शेतीपूरक कामांमध्ये सहभागी महिलांचा यामध्ये समावेश आहे.

तसेच भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, भूमिहीन शेतकरी, भूमिहीन पशुपालक, शेतमजूर, रोपमळा मजूर आणि पशुचारक यांनाही या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून पात्र महिला शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (https://krishi.maharashtra.gov.in) भेट देऊन महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन करतो. 

#dattatraybharne #womenfarmers #WomenEmpowerments #FarmerEmpowerment #MaharashtraAgriculture #agriculture #womeninagriculture #महिलाशेतकरी #महिलाशेतकरीसक्षमीकरण #शेतकरी #महिलासक्षमीकरण #कृषिविभाग #महाराष्ट्र
close