व्याहाळी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्याहाळी, ता. इंदापूर येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘विकसित भारत 2047’ या उपक्रमास आज, दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी केंद्र प्रमुख भारत शेंडे यांचे उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली.
हा उपक्रम 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध उपक्रम व स्पर्धांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.
अभियानाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेवर आकर्षक रांगोळी साकारली. तसेच विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून विकसित भारताचा संदेश दिला. यासोबतच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या अभियानांतर्गत आगामी काळात ‘माझ्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत 2047’ या विषयांवर निबंध/लेखन, चित्रकला, वक्तृत्व तसेच विविध सर्जनशील स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, सर्जनशीलता आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘माझा भारत—विकसित भारत’ या संकल्पनेला कृतीतून अभिवादन केले. शाळेच्या परिसरात या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या संपूर्ण अभियानाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक प्रभाकर लावंड उपशिक्षक तात्याराम धायतोंडे खुशाली धायतोंडे कैलास गावडे व संतोष हेगडे मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

