shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रद्धेय कर्मयोगी शंकरावजी पाटील ( भाऊ ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी केले अभिवादन* - कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी महाराष्ट्रासाठी मोठे कार्य केले - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात - शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे चला संस्कार जपुया यावर व्याख्यान

*श्रद्धेय कर्मयोगी शंकरावजी पाटील ( भाऊ ) यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांनी केले अभिवादन*
   - कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी महाराष्ट्रासाठी मोठे कार्य केले - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
   - शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे चला संस्कार जपुया यावर व्याख्यान
     इंदापूर: माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकरावजी बाजीराव पाटील (भाऊ ) यांच्या 20 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवा नेते व संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवार ,मान्यवर, संस्थेचे सचिव व सर्व संचालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 
  समाधी स्थळावर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले. 
     श्री. नारायणदास रामदास प्रशालेमध्ये शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे 'चला संस्कार जपुयात' या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यांनी शिवचरित्र तसेच वर्तमान काळातील अनेक विषयावरती भाष्य करीत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
 यावेळी बोलताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी 1952 पासून आमदार, खासदार तसेच मंत्री पदाच्या माध्यमातून  महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले.तोच वारसा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुढे चालवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
    माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,'  कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे  देशपातळी बरोबरच महाराष्ट्र तसेच इंदापूर तालुक्यामध्ये कृषी, सहकार तसेच शिक्षण, औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे.सामान्य माणसांना न्याय दिला.नव्या पिढीला संस्कारक्षम बनविले.'
    कर्मयोगींच्या स्मृतिदिनानिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
     मोठ्या संख्येने मान्यवरांनी यावेळी भाऊंना अभिवादन केले.
close