shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी मधील विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत डंका. उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान*

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी मधील विद्यार्थ्यांचा राज्य गुणवत्ता यादीत डंका. उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते सन्मान*

इंदापूर: श्री गणेश कला क्रिडा रंगमंच स्वारगेट येथे दिनांक 05/09/2026 रोजी जिल्हा आदर्श शिक्षक, अध्यक्ष चषक शिष्यवृत्ती परीक्षा यादीतील सर्व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामधे पुणे जिल्हामधून 339 शाळा या गुणगौरवासाठी पात्र ठरल्या होत्या, त्यामधे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल  लाखेवाडीचे परवीन महमद पठाण व प्रसेनजित सचिन झेंडे यांचा सन्मान महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ​
 कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, भोर तालुक्याचे आमदार मा. श्री. शंकर मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री. वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष मा.श्री. विवेक वळसे-पाटील, सभागृह नेते मा.  पुणे  जिल्हा परिषद सदस्य, गटनेते श्री. श्रीमंत ढोले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. चंद्रकांत वाघमारे, सर्व विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, सर्व गटशिक्षणाधिकारी व पुणे जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

लाखेवाडी सारख्या ग्रामीण  भागातील  मुलांनी राज्य गुणवत्ता यादीत 16 क्रमांक मिळवण्याचा बहुमानाचा पटकावला, कारण संस्थेत दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे उभारणी करण्यात आलेली आहे, म्हणुनच आज सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थीही राज्य पातळीवर झळकताना दिसत आहे, एक आदर्श शैक्षणिक संकुल म्हणुन आज जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचा नावलौकिक वाढत आहे. 
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा गटनेते,पुणे जिल्हा परिषद सदस्य मा .श्री.श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष सौ.चित्रलेखा ढोले, सचिव श्री. हर्षवर्धन खाडे सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे,
 मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव, विश्वस्त चि. पृथ्वीराज ढोले, 
चि. ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. गणेश पवार,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री. सम्राट खेडकर, मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
close