सामाजिक कार्याचे कौतुक; पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार
नाशिक/त्र्यंबकेश्वर : जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी तसेच घुश्मेश्वर मंदिराचे उत्तराधिकारी, त्र्यंबकेश्वर-नाशिक येथील १०८ शांतिगिरी महाराज यांनी सामाजिक कार्यकर्ते गायके-पाटील यांनी महाराजांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी शांतिगिरी महाराज यांनी गायके-पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची प्रशंसा करून. समाजहितासाठी सातत्याने केले जाणारे कार्य, सामाजिक बांधिलकी आणि गरजू घटकांसाठी उभे राहण्याची त्यांची भूमिका याबद्दल महाराजांनी मनापासून कौतुक केले.
या सदिच्छा भेटीप्रसंगी गायके-पाटील यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या भेटीमुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
समाजाच्या उन्नतीसाठी अध्यात्मिक क्षेत्रातील संत-महंत आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे काम केल्यास समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असा संदेश या सदिच्छा भेटीतून अधोरेखित झाला.
०००

