इंदापूर: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीतील विद्यार्थ्यांनी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन या सणासाठी भारतीय सैनिकांसाठी राख्या बनवण्याचा उपक्रम हाती घेतला. रक्षाबंधन म्हणजेच भारतीय संस्कृतीनुसार बहिण-भाऊ या दोघांमधील अतूट नाते जपण्याचा जिव्हाळ्याची व विश्वासाची आठवण करून देणारा असा पवित्र व प्रेमाचे प्रतीक असणाराअसा हा सण.
देशासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, बर्फाच्छादित आणि दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या जवानांचे आत्मबल वाढवण्यासाठी एक राखी सैनिकांसाठी हा नवोपक्रम विद्यार्थ्यांनी राबवला व भारतीय सैनिकांसाठी जेबीव्हीतील विद्यार्थ्यांनी भावनांचे रेशमी बंध जपून पर्यावरण पूरक अशा सुंदर आकर्षक राख्या तयार केल्या. सैनिकांचे मनोधर्य वाढवण्यासाठी व संपूर्ण देश आपल्या सोबत आहे या जाणिवेने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राख्या बनवल्या व त्या राखा भारतीय सैनिकांसाठी पोस्टाने पाठवून दिल्या.
यासाठी नेहमीच प्रेरणा देणारे जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषद सदस्य गटनेते श्रीमंत ढोले संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव , संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे ,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषी भैय्या ढोले विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य सम्राट खेडकर , प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर सर्व विभागाचे सुपरवायझर्स व शिक्षक यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.

