shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बिरूदेव हरिबा शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने रुई पंचक्रोशीवर शोककळा

बिरूदेव हरिबा शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने रुई पंचक्रोशीवर शोककळा 
इंदापूर: रुई-थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील किराणा व्यवसायिक तसेच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात परिचित असलेले उद्योजक  बिरूदेव हरिबा शिंदे यांचे सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रुई-थोरातवाडी परिसरात तसेच त्यांच्या परिचित व मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

  बिरूदेव शिंदे यांनी रुई-थोरातवाडी परिसरात किराणा व्यवसायाच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. तसेच वाघजाई सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्यातील विविध भागांतील नागरिकांशी आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. मेहनत, प्रामाणिकपणा, व्यवसायातील सातत्य आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव यामुळे ते परिसरात परिचित होते.त्यांच्या पश्चात आई-वडील, चुलते, चुलत्या,भाऊ, पत्नी, दोन मुले, एक सून आणि नात असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनाने शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बिरूदेव शिंदे यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता थोरातवाडी-रुई येथे सावडण्याचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. “बिरूदाजी तथा नाना या नावाने सर्वपरिचित असणारे बिरूदाजी तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं आज तुमची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत आहे. तुमच्या आठवणी सदैव आमच्या हृदयात जिवंत राहतील.”ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि शिंदे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
close