निमसाखर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
निमसाखर : माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमसाखर जिल्हा परिषद केंद्र शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधवमळा कारंडेवाडी लवटे वस्ती वीर वस्ती येथे विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास इंदापूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती जयकुमार कारंडे, अर्बन बँकेचे चेअरमन गोविंदराव रणवरे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल बोंद्रे, निमसाखरचे माजी सरपंच युवराज रणमोडे पाटील, नीरा-भीमाचे माजी संचालक . गोरे आबा, डी. एम. चौधरी तसेच संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा निमसाखर, लवटे वस्ती, कारंडेवाडी तसेच वीर वस्ती येथील प्राथमिक शाळांमधील सुमारे ३५० विद्यार्थ्यांना हर्षवर्धन पाटील यांच्या छायाचित्राचे पॅड तसेच खाऊचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे आनंद पाहायला मिळाला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असून, भविष्यातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

