shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन*- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, रांगोळीस्पर्धा, क्रीडा स्पर्धा व सदिच्छा दौडचे महाविद्यालयात आयोजन

*इंदापूर महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन*
- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, रांगोळीस्पर्धा, क्रीडा स्पर्धा व सदिच्छा दौडचे महाविद्यालयात आयोजन
         इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात  आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी दिली.
     डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,' विद्यार्थ्यांकरिता व सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी विविध विधायक उपक्रम महाविद्यालयात राबवून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. 21 ऑगस्ट रोजी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा तसेच सदिच्छा दौडचे आयोजन केले आहे. या उपक्रमात आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.'
     यावेळी उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, तसेच डॉ. महादेव वाळुंज,डॉ. भरत भुजबळ,डॉ. सदाशिव उंबरदंड, प्रा. रवींद्र साबळे उपस्थित होते.
close