shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घोडेगावात तंबाखूचा ‘महासाठा’! १०.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त; कारवाईनंतर ‘सेटलमेंट’च्या चर्चेने खळबळ

घोडेगावात तंबाखूचा ‘महासाठा’! १०.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त; कारवाईनंतर ‘सेटलमेंट’च्या चर्चेने खळबळ,५.६८ लाखांचा प्रतिबंधित तंबाखू आणि ५ लाखांची कार पोलिसांच्या ताब्यात; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.

मोहन शेगर,सोनई  : 
शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक करण्याच्या उद्देशाने साठा केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव येथे धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ५ लाख ६८ हजार ५१० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण १० लाख ६८ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांविरुद्ध सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.५० वाजताछत्रपतीसंभाजीनगर-अहिल्यानगर मार्गावरील घोडेगाव येथील दर्शन किराणा दुकान परिसरात संशयास्पद वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.पोलिसांनी एमएच ३२ एवाय ०२६१ क्रमांकाची कार ताब्यात घेतली. पंचनाम्यानुसार जप्त तंबाखूजन्य पदार्थांची किंमत ५ लाख ६८ हजार ५१० रुपये असून, कारची किंमत सुमारे ५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या कारवाईत एकूण १० लाख ६८ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक राहुल डोके यांच्या फिर्यादीवरून यश मनोज नहार (रा. घोडेगाव) आणि अजित हनुमंत पवार (रा. कुसळम, ता. पाटोदा) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव करीत आहेत. प्रतिबंधित तंबाखूची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईनंतर ‘सेटलमेंट’च्या चर्चेने संशयाचे धुके!घोडेगावातील कारवाईत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त झाल्याने तंबाखू विक्रीचे जाळे किती खोलवर आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, ज्या ग्राहकांना किंवा किरकोळ विक्रेत्यांना संबंधित दुकानातून प्रतिबंधित तंबाखूची विक्री झाल्याचा संशय आहे, त्यांच्याविरुद्ध कारवाई झाली का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.कारवाईनंतर संबंधितांकडून माहिती घेऊन पुढील साखळीपर्यंत तपास पोहोचविण्यात आला का, याबाबतही स्पष्टता अपेक्षित आहे. मोठा साठा जप्त करून केवळ दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रतिबंधित तंबाखूच्या वितरण साखळीचा तपास कुठपर्यंत पोहोचला, हा मुद्दा चर्चेत आला आहे.

 कारवाईपेक्षा तडजोडींची चर्चा’ — सत्य काय?
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एखाद्या ठिकाणी कारवाईसाठी गेल्यानंतर कारवाईपेक्षा तडजोडींना अधिक महत्त्व दिले जाते, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. मात्र, या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणात प्रत्यक्षात कोणावर कारवाई झाली, कोणाकडून माल खरेदी-विक्री होत होती आणि तपासात कोणाची चौकशी करण्यात आली, याबाबत पोलिसांनी पारदर्शक माहिती देण्याची मागणी होत आहे.प्रतिबंधित तंबाखूचा पुरवठा करणाऱ्यांपासून तो विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्यांपर्यंत संपूर्ण साखळीचा तपास झाला तरच अशा कारवायांना खऱ्या अर्थाने आळा बसेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?                   मोठा साठा जप्त; मात्र पुढची साखळी कुठे?
घोडेगाव येथे ५.६८ लाखांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. कारवाई निश्चितच कौतुकास्पद असली, तरी या मालाची विक्री कोणाला करण्यात आली होती? कोणत्या दुकानांमध्ये किंवा व्यक्तींमार्फत त्याचा पुरवठा होत होता? याचा तपास झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईनंतर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. ‘कारवाईच्या आडून सेटलमेंट होते का?’ अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू  निष्पक्ष चौकशी करून तंबाखूच्या पुरवठा-विक्रीची संपूर्ण साखळी उघड करावी आणि ‘सेटलमेंट’च्या चर्चेत तथ्य आहे का, हे पोलिस प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.           
मोहन शेगर सामाजिक कार्यकर्ते सोनई
close