shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"घमंड सोड मना, साईचरणी झुकावे"

🌹🌹🌹 ॐ साई राम 🌹🌹🌹

घमंड सोड मना, साईचरणी झुकावे,
दोन दिवसांचा संसार, प्रेमाने सजवावे..!
पैसा-गाडी-बंगला, सारे इथेच रहाते,
शेवटी साईनाम घेता, मनाला सुख लाभते..!


रिपोर्ट नॉर्मल असेपर्यंत, जग सारे आपले वाटे,
क्षणात संकट येताच, देवच आठवणीला येते..!
अहंकार सोडून हृदयी, प्रेमाची ज्योत पेटवावी,
दुःखात दुसऱ्याला साथ देऊन, माणुसकी जपावी..!

दुसऱ्याला झुकवण्यात , खरी श्रीमंती नाही मानावी,
स्वतः झुकून प्रेमाने, प्रत्येकाला मान द्यावी..!
दुसऱ्याच्या सुखात सुखी, अशी वृत्ती ठेवावी,
श्रद्धा-सबुरीच्या वाटेवर, साईकृपा सदैव मिळावी..! 

मालक नाही या जगाचा, पाहुणा बनुनी यावे,
प्रेम वाटता जगामध्ये, जीवन धन्य व्हावे..!
ॐ साई राम... ॐ साई राम...
अहंकार विरघळू दे, साईचरणी मन रमावे..! 

प्रस्तुती: 'शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह म्युझिक टिम', अहिल्यानगर 
गितकार: रमेश जेठे सर, जिल्हा अहिल्यानगर
close