shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नारायणास्त्रआपण मेलो कि,जग संपले,
एवढेच लक्षात ठेवा!

😌😌😌😌😌😌😌😌
हिंदूंचे महत्वाचे सण,
साजरे झाले घरात!
मुस्लिम ही त्याचप्रमाणे,
मनवताहेत शबे बारात!!अशीच घेतली सर्वांनी,
जर का समझदारी!
हतबल होऊन परतेल ही,
चायनीज महामारी!!

काय घडले कुणामुळे,
चर्चेला देऊन फाटा!
शांतता संयमाने शोधू,
जीवनाच्या नवीन वाटा!!

पोलीस प्रशासन कष्ट उपस्तात,
नेत्यांनो तुम्हीही सांगा!
मोंढ्यावर ही नकोय गर्दी,
रेशनला नकोत रांगा!!

अति सूक्ष्म आहे सैनिक,
पण लढाई आहे मोठी!
"मला कसलं काय होतंय",
ही वलग्ना आहे खोटी!!

इटली,अमेरिका जगासमोर,
रडून कान धरत आहेत!
आजही तेथे रोज सुमारे,
हजार माणसे मरत आहेत!!

अनेक प्रगतिशील देशांच्या,
नेत्यांचे लागलेत नंबर!
तिसऱ्या स्टेज मध्ये रुग्ण,
एकाचे होतात शंभर!!

तीर्थ करून थकले कुणी,
दान टाकून भागले!
आरोग्यासाठी मूर्तीलाच 
मंदिरात कोंडावे लागले!!

मानव निर्मित आहेत धर्म,
जात पंथ आणि वर्ग!
ग्रहांवर मुक्काम ठोकतोय माणूस,
कुठेच नाही स्वर्ग!!

हतबल होतो माणूस तेंव्हाच,
बोंबलतो,"हे देवा"!
आपण मेलो की जग संपले,
एवढेच लक्षात ठेवा!!

        कवी
  राजाभाऊ नारायणे
   9850608131
    दि.08/04/2020
close