shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणा-या आरोपींना न्यायालयाचा दणका..!!

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी,
दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार  ता. ११/०२/२०२६
राहुरी : फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय वर्षे १७, हिस फुस लावून तिला प्रेमामध्ये अडकवून तिला वेळोवळी फोन करून, मानसिक त्रास देवून, दमदाटी करून तिला तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणा-या आरोपी कं १ अंश सचिन रत्नपारखी व आरोपी क २ अर्चना सचिन रत्नपारखी, दोघे रा. अमित सर्विस स्टेशन जवळ, गणेश नगर, बोल्हेगाव फाटा, नागापूर, ता.जि. अहिल्यानगर यांचा पूर्वी मंजूर झालेला पूर्व अटक जामीन मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश क. ६ तसेच विशेष न्यायाधीश जलदगती न्यायालय, मा. डॉ. यू.जे. मोरे साहेब यांनी रदद केलेला आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी वय, वर्ष १७ हीस आरोपी क १ यान े ती अल्पवयीन असताना देखील तिला फुस लावून प्रेमामध्ये अडकवून आरोपी क १ अंश रत्नपारखी व त्याची आई अर्चना रत्नपारखी यांनी संगनमतान े मयत मुलगी हिचे मोबाईलवर वेळोवेळी फोन करून तिला मानसिक त्रास देवून दमदाटी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तिने दिनांक ०९/०१/२०२५ रोजी दुपारच्या वेळी राहत्या घरी हॉलमध्य े पंख्याला साडी बांधून गळफास घेउन आत्महत्या केलेली होती.
         आरोपीविरुध्द भा. न्या.स. कलम १०७, ३(५) नुसार गुन्हा दाखल केलेला होता. व त्यानंतर आरोपी कं १ व २ यांनी मा. न्यायालयात अटकपूर्व जामीन घेतला. सदरचा जामीन मिळाल्यानंतर फिर्यादी तसेच पिडीत या अनुसुचित जातीच्या असल्याने तसेच मयत पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याने या गुन्ह्यामध्ये पोक्सो कायदा कलम १२ तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कलम ३ (२) (V) व ३ (१) (r) यानुसार कलमवाढ झाली होती. सदरच्या गुन्हामध्य े तपास पूर्ण करून चार्जशीट उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अमोल भारती, अहिल्यानगर शहर विभाग, अहिल्यानगर यांनी दाखल केलेले होते. सदर प्रकरणी मूळ फिर्यादी या स्वतःहून मे. कोर्टात हजर झाल्या व त्यांनी त्यांचे वकिल श्री. ताकटे यांच े मार्फत आरोपी यांचा जामीन अर्ज रद्द करणेबाबत मागणी केली. त्यानंतर या प्रकरणातील सरकारी वकिल श्रीमती. एम.पी. केळगंद े यांनी तपासी अधिकारी यांच्याकडून प्रस्तावाची मागणी करून रून त्याबाबत मा. न्यायालयात म्हणण े दाखल केले. त्यानंतर सरकारी वकिल यांनी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणले की, सदरच्या प्रकरणात पोक्सो कायदा तसेच अॅटॉसिटी कायद्यांतर्गत जामीन अर्ज दाखल झाल्यानंतर कलम वाढ करण्यात आली नव्हती. आरोपींनी केवळ भा. न्या.स. अंतर्गत जामीन घेतलेला होता. परंतु आरोपींनी पोक्सो व अॅट्रॉसिटी या विशेष कायद्यांतर्गत जामीन घेतलेला नाही. वास्तविक पाहता सदरच्या गुन्हयामध्य े वाढीव लागलेली कलमे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत. असे असताना देखील आरोपींनी याबाबत मा. न्यायालयात हजर होउन जामीन घेतलेला नाही. तसेच तपासात अल्पवयीन पिडीत मुलीचा छळ झाल्याचा व त्यातून तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत असल्याने आरोपींना संरक्षण देणे योग्य नसल्यान े त्यांचा जामीन रद्द होणे कायद्याच्या व हिताच्या दृष्टीन े योग्य होईल.
      मा. न्यायालयान े दोन्ही बाजूंच े म्हणण े व कागदपत्र विचारात घेउन तसेच नव्यान े लागू झालेल्या गंभीर कायद्यांच्या पार्श्वभूमीवर आधी दिलेला जामीन कायम ठेवणे कायद्याच्या उद्देशास बाधक ठरेल असे निरीक्षण नोंदवून आरोपी कं १ व २ नाम े अंश सचिन रत्नपारखी व अर्चना सचिन रत्नपारखी यांचा पूर्व अटक जामीन रद्द केला व तसेच आरोपींना एका आठवड्याच्या आत तपास अधिका-यासमोर शरण येण्याच े आदेश दिले. परंतु, आरोपी स्वतः ८ दिवसात हजर न झाल्यास पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असे आदेशात नमूद केलेले आहे.
      याप्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल श्रीमती मनिषा. पी. केलगंद े शिंदे हे काम पाहत आहेत. त्यांना जिल्हा सरकारी वकिल श्री. सतिश कि. पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले. तसेच मूळ फिर्यादीतर्फे अॅड. ताकटे व अॅड. फळे यांनी तसेच कोर्ट पैरवी पीएसआय संजय चव्हाण व म.पो.कॉ. अडसूळ यांनी सहकार्य केले.

Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close