शिर्डी प्रतिनिधी:
लबडे वस्तीमधील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक आणि धर्मपरायण महिला सौ. भिमाबाई भानुदास लबडे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, या उद्देशाने त्यांच्या परिवाराच्या वतीने उद्या गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच लबडे वस्ती, वाकडी येथे दशक्रिया विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ह.भ.प. स्वरभास्कर उत्तम महाराज गाढे यांचे सुश्राव्य प्रवचन आणि श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असून, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व नातेवाईकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कै. सौ. भिमाबाई लबडे या अत्यंत मनमिळाऊ, कष्टाळू आणि धार्मिक होत्या. त्यांच्या पश्चात पती श्री. भानुदास विश्वनाथ लबडे, दीर श्री. एकनाथ विश्वनाथ लबडे, मुले डॉ. वसंत भानुदास लबडे व श्री. भाऊसाहेब भानुदास लबडे, तसेच पुतणे श्री. अशोक एकनाथ लबडे व श्री. गोरक्षनाथ एकनाथ लबडे आणि सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने लबडे (पा.) परिवारावर व वाकडी गावावर शोककळा पसरली आहे.

