भटके विमुक्त समूह दाखला मेळाव्याचे राज्य शासनाने शासन निर्णय काढला यामध्ये महेंद्र भोसले यांच्या प्रयत्न - तहसीलदार जीवन बनसोडे.
इंदापूर तहसील कार्यालयात भटके विमुक्त समूह दाखला मिळायचे आयोजन.
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पडस्थळ गावचे व भटक्या विमुक्त जमाती जाती विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महिंद्र भोसले हे गेली दोन वर्षापासून पाठपुरावा करत असून त्यांनी दाखले देण्यासाठी मेळावे घ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना शासनाचे लाभ शासनाने पोहोचवावे अशी तळमळ असलेला हा कार्यकर्ता आहे. त्यांनी माझ्यापासून मंत्रालयापर्यंत फेरे घातले. आंदोलन,उपोषण केली. शेवटी त्यांच्या प्रयत्नातून शासनाने भटके विमुक्त जाती जमातीसाठी समूह दाखले मिळावाचे आयोजन करून त्यांची प्रलंबित कागदपत्रे व योजना पोहोचवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मंडल, तालुका,जिल्हा स्तरापर्यंत मेळाव्याचे आयोजन करण्याचा शासन निर्णय काढला असून प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तीन महिन्याला या मेळाव्याचे आयोजन शासकीय स्तरातून कारण्याचे नियोजिले असल्याचे प्रतिपादन इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी भटके विमुक्त समूह दाखला मिळाला प्रसंगी केले .
इंदापूर तहसील कार्यालयात भटके विमुक्त समूह दाखला मेळाव्याचे आयोजन दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार तसेच मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, भटके विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते महेंद्र भोसले, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त मुंबई महानगरपालिका महादेव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेगर, उमेश शिंदे, प्रकाश शिंदे, रविंद्र भोसले शिवाजी अय्यर, विकास मिसाळ इत्यादी व अनेक भटके विमुक्त जाती जमातीतील मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारचे दाखले व योजना या सदर्भात
सुमारे 250 लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते.
तसेच तहसीलदार जीवन बनसोडे पुढे म्हणाले की शासन निर्णयामध्ये प्रसिद्ध केलेल्या तारखा पुढीलप्रमाणे असून दि. 6/ 10/ 2026, 5/1/ 2027, 6/ 4/ 2027, 6 /7 /2027 यानंतर अशाच कालाक्रमानुसार प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी भटके विमुक्त समूह दाखला मिळावा याप्रमाणे वर्षांमध्ये चार मिळावे आयोजित करण्याचे निर्देश दिले असून प्रायोगिक तत्त्वावर त्याचे आयोजन आज इंदापूर तहसील कार्यालय येथे केले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच या दाखल्यामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,रहिवासी प्रमाणपत्र, आदिवासी दाखला,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्ममृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्राबाबत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना बाबत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांच्या तक्रारी सत्वर निकालात काढण्यात याव्यात.
सदर भटके विमुक्त समूहाचा दाखला मेळाव्यामध्ये तालुकास्तरावरील संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,मुख्याधिकारी, तहसीलदार तसेच लाभांसी संबंधित विभागाच्या सक्षम अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सदर मेळाव्यांना मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील,कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका यांनी व्यक्तिशः उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे शासन निर्णयानुसार त्यांनी सांगितले व जास्तीत जास्त या मेळाव्याचा फायदा घेऊन आपले समूह दाखले काढून घ्यावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले याप्रसंगी महेंद्र भोसले, मनोज शिंदे,लक्ष्मण शेगर,उमेश शिंदे, प्रकाश शिंदे यांनी आपले अडचणी संदर्भात मनोगत व्यक्त केले.

