लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयात हर्षवर्धन पाटील यांचा ६३ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा*
. सेवा, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा संकल्प—वाढदिवसाला विधायक उपक्रमांची जोड!”
इंदापूर- बोराटवाडी : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा ६३ वा वाढदिवस लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी येथे विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.*
ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस 21ऑगस्ट होता, त्यांच्या शुभहस्ते प्रतिनिधिक स्वरूपात केक कापून माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
"रक्तदान हेच श्रेष्ठदान—रक्तदानातून जीवनदान!”
*या माध्यमातून वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल ९३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
विद्यालयाच्या प्रांगणात मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले
वाढदिवसानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.*.
पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या सौ. विमल किसनराव काळे यांच्या वतीने विद्यालयातील ५७५ विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून हर्षवर्धन पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याचा आणि जीवनप्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संचालक अनंतराव काळकुटे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास दत्तूअण्णा सवासे, दयानंद गायकवाड, रामभाऊ पाटील, अजिनाथ बोराडे, अमर काळकुटे, किरण पाटील,किसन काळे , तुकाराम बर्गे, बबन रुपनवर, भाऊसाहेब काळकुटे, मोहन मारकड, कृष्णा बोराडे, आबासो मारकड , सुखदेव निकम, पोपट सुद्रिक, संतोष गायकवाड, डॉ. धनाजी इंगवले, निलेश हेगडकर, भाऊ सवासे, विजय गायकवाड, दादासो मारकड, दीपक पवार, बाबुराव फडतरे, हनुमंत कदम, देवा सवासे तसेच बोराटवाडी, खोरोची, चाकाटी, रेडणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत कोकाटे सर यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश धुमाळ यांनी केले, तर आभार अमर निलाखे यांनी मानले

