पारंपरिक खेळ व क्रीडा स्पर्धेत इंदापूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयाच्या ज्यूनिअर कॉलेजच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन
इंदापूर: नागपंचमी तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील जुनिअर कॉलेजच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत आपला आनंद द्विगुणित केला.
पारंपरिक खेळ सुरपाट्या तसेच गोळा फेक, लिंबू चमचा खेळात विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक अभिमन्यू भंडलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिदास भांगे यांनी केले.
यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.

