सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२६ पहिल्या श्रावणी सोमवारची अविस्मरणीय योगसाधना .
इंदापूर: श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्याच्या पावन सान्निध्यात, पतंजली योग समिती, योगसाधकांची आजची योगसाधना अत्यंत भक्तिमय, चैतन्यमय आणि अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाली.
पहाटेच्या प्रसन्न वातावरणात शिवतांडव, महादेवाच्या भक्तिगीते आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या शिवनामाच्या तालावर योगसाधना करताना शरीर, मन आणि श्वास यांचा सुंदर समन्वय अनुभवायला मिळाला. महादेवाच्या चरणी, ग्रामदैवताच्या प्रांगणात योगसाधना करण्याची ही अनुभूती खरोखरच शब्दांच्या पलीकडची होती .
यासाठी योग शिक्षक भालचंद्र भोसले ,शरद झोळ सर, बाजीराव शिंदे ,अशोक अनपट सचिन पवार यांनी मार्गदर्शन केले .
योग साधने मुळे शरीरात झालेले सकारात्मक बदल, मनामध्ये आलेली प्रसन्नता, श्वासामध्ये आलेली सहजता आणि विचारांमध्ये निर्माण झालेली सकारात्मकता . योग म्हणजे केवळ आसन किंवा व्यायाम नसून, स्वतःशी आणि आपल्या अंतरात्म्याशी जोडणारी साधना आहे,
आज ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महादेवाच्या साक्षीने झालेली ही योगसाधना केवळ व्यायाम नाही तर शरीराची साधना, मनाची शांती, श्वासाची जाणीव आणि आत्मिक चैतन्याची अनुभूती मिळते .
सिध्देश्वर मंदिर ट्रस्टचे
महेश भिंगे, गजानन निलाखे खुशाल महाराज कोकाटे . सफल घासकाटू , महादेव चव्हाण, हमीद आत्तार, कृष्णा ताटे ,संतोष घासकाटू, रुपेश सोनी,वसंत लोंढे साहेब, मंदिराचे पुजारी गिरिश गुरव, श्रीकांत गुरव यांनी या कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले .
योग वर्गासाठी महिलांची विशेष लक्षणीय उपस्थिती होती .
निरोगी शरीर… प्रसन्न मन… आणि आनंदी जीवन!

