shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत श्री साई परिक्रमेत भाविकांचा महासागर; साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीतर्फे मोफत मठ्ठा वाटप


शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डीत आज लाखो साईभक्तांच्या उपस्थितीत 'श्री साई परिक्रमा' सोहळा मोठ्या श्रद्धेने व उत्साहात पार पडला. या भक्तीमय वातावरणात देशभरातून आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी 'श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शिर्डी' यांच्या वतीने परिक्रमेत सहभागी झालेल्या भाविकांसाठी मोफत थंड मठ्ठा आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण सेवा उपक्रमाप्रसंगी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांच्यासह संचालक मंडळातील सर्व संचालक आवर्जून उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "साई भक्तांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे".
पुढे माहिती देताना श्री. पवार म्हणाले की, "साई परिक्रमा हे ३६५ दिवस सुरू असणारे एक अखंड व्रत आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या प्रत्येक 'साई प्रसाद स्टॉल'वर साई परिक्रमेचे विशेष स्टिकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे स्टिकर साई भक्तांना वर्षभर मोफत दिले जाणार आहेत".
शिर्डीत देशभरातून आलेले साईभक्त या मोफत सेवेचा मोठ्या आनंदाने लाभ घेत आहेत. शिर्डीतून परिक्रमेची ही सकारात्मक ऊर्जा घेऊन साईभक्त आपापल्या गावी परतत असून, ही ऊर्जा त्यांच्या भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. परिक्रमेत चालून थकलेल्या भाविकांना या थंड मठ्ठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, भाविकांमध्ये मोठे समाधान व्यक्त होत आहे. सोसायटीच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र तोंडभरून कौतुक करण्यात येत आहे.

close