shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चैतन्य कानिफनाथ मंदिर ते गोरक्षनाथ गड पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन..

वांबोरी (ता. राहुरी) : कोळ्याचीवाडी व पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या चैतन्य कानिफनाथ मंदिरापासून गोरक्षनाथ गडापर्यंत भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजता चैतन्य कानिफनाथ मंदिर येथून दिंडीचे प्रस्थान होणार असून, सोमवार दि. २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दिंडीमध्ये काकडा, भजन, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भारुड तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिंडीचा मार्ग कानिफनाथ मंदिर–कोळवाडी वाडी–चांबोरी–पाची महादेव वस्ती–डोंगरगण मार्गे गोरक्षनाथ गड असा राहणार आहे. या धार्मिक यात्रेत पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या दिंडी सोहळ्यासाठी विविध मान्यवर, भजनी मंडळे तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. दिंडीतील भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात येत असून, धार्मिक वातावरणात भक्तिमय जयघोषात दिंडी गोरक्षनाथ गडाकडे मार्गस्थ होणार आहे.

भाविकांनी दिंडीचे नियम व शिस्तीचे पालन करून, प्लास्टिक कागद, ताट, तांब्या आदी साहित्य स्वतःसोबत आणावे. तसेच सामानासाठी वाहनाची व्यवस्था उपलब्ध असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या भक्तिमय पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन गोरक्षनाथ महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
close