shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शकुनीसारखे लोक भावा, डाव मनात रचती,

शकुनीसारखे लोक भावा, डाव मनात रचती,

गोड गोड त्या शब्दांमधुनी, नाती सारी जाळती ।
फासे आता हातात नाही, शब्दांचे डाव टाकती,
ओळख त्यांना वेळेआधी, नाहीतर महाभारत घडती ॥

डावही त्यांचा, खेळही त्यांचा, चालही त्यांची भारी,
दोष दुसऱ्याच्या माथी मारून, बनती स्वतः निष्पाप सारी ।
नात्यांमध्ये विष कालवून, भांडणाची आग लावती,
आपण मात्र सज्जन आहोत, अशीच दुनिया दाखवती ॥



शकुनीसारखे लोक भावा, डाव मनात रचती,
गोड गोड त्या शब्दांमधुनी, नाती सारी जाळती ॥

गोड बोलणे म्हणजे प्रेम, असे समजू नको भावा,
डोळ्यांमधला भाव निरखून, चेहऱ्यावरचा हेतू पाहा ।
शब्दांपेक्षा कर्म तपासा, सत्याची वाट धरावी,
विश्वास ठेवताना आधी, माणसाची पारख करावी ॥

एकाला दुसऱ्याविरुद्ध, कानामध्ये मंत्र सांगती,
आपलीच माणसे दूर करून, मग आपलीच बाजू मांडती ।
हसरा चेहरा, गोड वाचा, पण मनात वेगळीच चाल,
अशा माणसांपासून भावा, जपून ठेव तुझा संसार ॥

कौरव-पांडव दूर करण्याचा, शकुनीचा होता डाव,
आजही काही माणसांमध्ये, दिसतो त्याचाच भाव ।
महाभारत घरात नको रे, नात्यांमध्ये प्रेम राहू दे,
साईचरणी ठेवून श्रद्धा, सत्याचा दीप जळू दे ॥

पहिले ओळख माणसाला, मगच पुढची वाट धर,
गोड शब्दांवर भाळू नको, विवेकाचा हात धर ।
साई म्हणती भावा तुझ्या, सत्याचीच साथ धर,
शकुनी कितीही डाव रचो, साईनामाचा विजय कर! 🙏


प्रस्तुती "शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह" म्युझिक टिम,अहिल्यानगर 

गितकार: रमेश जेठे सर,जिल्हा अहिल्यानगर 

close