ओम दिलीप गरगडे यांना चि. कै. रोहन बाळासो गरगडे स्मृती पुरस्कार 2026 प्राप्त.
इंदापूर: चि. कै. रोहन बाळासो गरगडे स्मृती पुरस्कार 2026
अनंतराव पवार विद्यालयातील फेब्रुवारी मार्च 2026 एसएससी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी ओम दिलीप गरगडे यांना 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रदान करण्यात आला
अनंतराव पवार विद्यालय निरनिमगाव (ता- इंदापूर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासो गरगडे यांचा मुलगा कै रोहन यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी 90% पेक्षा जास्त व प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यास हा पुरस्कार दिला जातो नुकत्याच झालेल्या दहावी परीक्षेमध्ये चि.ओम दिलीप गरगडे यास 91 टक्के गुण मिळाले व प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याबद्दल त्यास सन्मानपत्र व रक्कम 10 हजार देऊन संस्थेच्या अध्यक्षांचे हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे, उपाध्यक्ष रणजीत घोगरे ,दीपक गरगडे, सौ अर्चना गरगडे संस्थेच्या विश्वस्त शोभाताई घोगरे, प्रताप देवडे, अन्नासो पवार, चंद्रकांत जाधव, धनाजी मुळीक, दीपक साळुंखे, मोहन सूर्यवंशी, अंकुश सावळकर, विलास मकर सर, शाळेतील अनंतराव पवार विद्यालय चे मुख्याध्यापक बाळासो मोरे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन पिसे व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

