shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कडे कामगार नाका" मानखुर्द मुंबई उपनगर येथील कामगारांसाठी वैद्यकीय सेवा मिळविण्याकरिता विशेष रूग्णवाहिकेची मागणी..*

मुंबई: आज दि. १ सप्टेंबर रोजी शिवसेना ओबीसी बारा बलुतेदार विभागाचे  राज्य संपर्क प्रमुख अनिल धमने पाटील, सोशल मिडिया राज्यप्रमुख संजय कुसळकर, यानी ईशान्य मुंबई चे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या मागणी मुळे त्या परिसरात शिवसैनिक, कामगार मोठया संख्येने पक्षाचे काम करीत आहेत मात्र त्यांच्या मुला बाळांना आजारी अत्यवस्थेत  आसल्यास किंवा एखादा अपघात झाल्यास कुंटुंबांना रुग्णालयात घेऊन जाण्या साठी रुग्ण वाहीकेचे अत्यंत आवश्यक्ता असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांना मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष भेटून दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उपरोक्त विषयान्वये आपल्या सविनय निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, "कामगार नाका" मानखुर्द, ता. कुर्ला, जि. मुंबई उपनगर परिसरामध्ये मोठ्या संख्येने बांधकाम मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे नाका कामगार वास्तव्यास आहेत. येथील "कामगार नाका" मानखुर्द, ता. कुर्ला, जि. मुंबई उपनगर येथे दररोज शेकडो कामगार कामाच्या शोधात एकत्र येतात.
हे सर्व कामगार अत्यंत कष्टकरी कुटूंबातील असून बांधकाम क्षेत्रात किंवा इतर ठिकाणी काम करताना अनेकदा गंभीर अपघात होणे, उंचावरून पडणे किंवा अचानक प्रकृती बिघडणे अशा आपत्कालीन घटना घडत असतात. अनेकदा आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे किंवा वेळेवर खाजगी वाहन उपलब्ध न झाल्यामुळे या गरीब कामगारांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. काही प्रसंगी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कामगारांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
या सर्व गंभीर बाबींचा विचार करता, या असंघटित नाका कामगाराच्या आरोग्याची सुरक्षा राखण्यासाठी आणि अपघातप्रसंगी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात पोहोचवण्यासाठी एका हक्काच्या रूग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता आहे.

आपणास विनंती की, कृपया आपल्या विशेष अधिकारातून किंवा १०८ रुग्णवाहिका सेवा (१०८ Ambulance Scheme) अंतर्गत "कामगार  नाका" मानखुर्द, ता. कुर्ला, जि. मुंबई उपनगर भागातील कामगारांसाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका मंजूर करावी ही रूग्णवाहिका संबंधीत कामगार नाका किंवा जवळच्या शासकीय रूग्णालयात तैनात ठेवल्यास शेकडो गरीब कामगारांना याचा मोठा जीवनदान देणारा लाभ होईल हि नम्र विनंती. असे निवेदनात म्हटले आहे.
close