४ सप्टेंबर रोजी बारामती महापूजेनंतर साईंच्या पालखीचे कुरवली येथे आगमन
नगर प्रतिनिधी: ( संजय महाजन )
शिर्डीच्या साईबाबांवरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावातून श्री साई सेवा सामाजिक ट्रस्ट, कुरवली, ता. इंदापूर, जि. पुणे यांच्या वतीने कुरवली ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा भक्तिमय पायी दिंडी सोहळा पार पडत असून, मोठ्या संख्येने साईभक्त या दिंडीत सहभागी झाले आहेत.
‘श्रद्धा आणि सबुरी’ हा साईबाबांचा संदेश मनात ठेवत साईनामाचा जयघोष, भजन, कीर्तन आणि धार्मिक वातावरणात साईभक्तांचा हा पायी प्रवास सुरू आहे. या दिंडीच्या माध्यमातून भक्तांना एकत्र आणत साईभक्ती, सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
साईंच्या पालखीचे कुरवलीत आगमन
या पायी दिंडी सोहळ्याचा विशेष भाग म्हणजे दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता बारामती येथे महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर कुरवली येथील साईभक्तांच्या घरी साईंच्या पालखीचे आगमन होणार असून, पालखीचे दर्शन व फराळासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालखीच्या आगमनानिमित्त कुरवली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, साईभक्तांकडून पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. साईंच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘साईनामाचा गजर अन् भक्तीचा जागर’
कुरवली ते शिर्डी या पायी दिंडीच्या माध्यमातून साईभक्तांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत असून, वाटचालीदरम्यान साईनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. साईबाबांच्या चरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी भक्त मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभागी झाले आहेत.
“शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे” या श्रद्धावचनाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याला साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन श्री साई सेवा सामाजिक ट्रस्ट, कुरवली यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, आपला – भाऊ भोसले, हृषिकेश भोसले आणि शुभम भोसले यांनी साईभक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. साईंच्या पालखीचे दर्शन, फराळ आणि भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, अशी नम्र विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.

