shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री बेलेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे होणार दिमाखदार आयोजन ; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार

 
अहिल्या नगरीत घुमणार श्री बेलेश्वरांचा महाजयघोष 

अहिल्यानगर / प्रतिनिधी

अहिल्यानगर :  सर्व अहिल्यानगर करांचे  भोलेनाथ महादेव भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या अहिल्यानगर शहराजवळील भिंगार रोड येथील बेलेश्वर मंदिरातील राजाधिराज श्री बेलेश्वर महाराज अतिभव्य महापालखी सोहळा होणार असून विशाल गणेश मंदिराचे पुजारी मा.महंत संगमनाथजी महाराज आणि श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आरती व पालखी प्रस्थान होणार आहे . सर्व साधू-संत, अहिल्यानगर जिल्ह्यातील मठांचे मठाधिपती सर्व नाथभक्त, नाथसेवक हजर रहाणार आहेत . दि .७ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवार निमित्त सकाळी ११ वाजता होणाऱ्या या महापालखी साठी मा. श्री. राधाकृष्ण विखे पाटील (जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री अहिल्यानगर ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
विशेष बाब म्हणजे सदर कार्यक्रमात आर्मी आणि पोलिस प्रशासनाची मानवंदना देखील राहणार आहे .

जिल्हाधिकारी डॉ. पंकजजी आशिया खासदार मा. श्री. निलेश लंके , पोलिस अधिक्षक  मा. श्री. मुम्मका सुदर्शन , मा. आ. संग्राम भैय्या जगताप ,
आमदार अक्षय कर्डिले,
महापालिका आयुक्त मा. श्री. यशवंत डांगे , मा . खासदार श्री. सुजय विखे पाटील, आय लव्ह नगरचे संस्थापक मा.नरेंद्रजी फिरोदिया आदि राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, उद्योग, व्यापार क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित रहाणार आहेत .
या पालखी सोहळ्याची शोभा द्विगुणित करण्यासाठी यात्रा सेवेकरी 
सनई चौघडा,तुतारी ,लाठी काठी ,मल्लखांब,वारकरी,
कलश यात्रा होणार असुन महाकाल अघोरी पथक , शिव तांडव नृत्य , पालखी , रुद्रनाद वाद्यपथक अहिल्यानगर ,गणांत ढोल पथक ,आम्ही नगरकर ढोल पथक ,हिंदुत्व ढोल पथक आदि पथक सहभागी होणार आहेत . “आ रही है पालखी श्री बेलेश्वर महाराज की " या घोषणांनी संपूर्ण सोहळा दणाणून निघणार आहे .

श्री विशाल गणपती मंदिर, माळीवाडा कपिलेश्वर मंदिर
→ ओंकारेश्वर मंदिर (कौठीची तालीम वसंत टॉकीज चौक -बंगाल चौक बुरुड गल्ली चौक धरती चौक हातमपुरा चौक -
जुनी कलेक्टर कचेरी विजयशंकर मंदिर SBI चौक -कॉन्वेंट शाळा चौक भुईकोट किल्ला मार्गे बेलेश्वर मंदिर असा पालखी मार्ग असणार आहे . तरी सर्व भाविक भक्तांनी महिला भगिनी नागरिकांनी या अतिभव्य दिव्य महापालखी सोहळ्यास उपस्थित रहावे असे बेलेश्वर भक्त मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .
close