shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहिल्यानगरचे बाळासाहेब भालेराव यांची लोककला लावणी निर्माता कलाकार संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री.बाळासाहेब भालेराव यांची लोककला लावणी निर्माता कलाकार संघ (महाराष्ट्र) यांच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, संघाच्या वतीने त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


विशेष म्हणजे, प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखाताई पुणेकर यांच्या हस्ते बाळासाहेब भालेराव यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व सांस्कृतिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

लोककला, लावणी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या समस्या सोडविणे, कलाकारांना संघटित करणे तसेच महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी लोककला लावणी निर्माता कलाकार संघ (महाराष्ट्र) कार्यरत आहे.

या पार्श्वभूमीवर बाळासाहेब भालेराव यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलावंत आणि कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या पदाचा उपयोग कलाकारांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि लोककलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी करणार असल्याचे भालेराव यांनी सांगितले.यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेश जी लोखंडे , गणेश गायकवाड, विलास जी उपस्थित होते.

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा
लोककला, कलाकार आणि त्यांच्या हक्कांसाठी सदैव आपल्या सोबत!
close