पिंपरी : ज्येष्ठ नागरिक संघ, काळेवाडीचे अध्यक्ष, बाबास्वामी योग साधक संघाचे संस्थापक अध्यक्ष, तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे परिषद प्रतिनिधी आणि प्रेरणास्थान आदरणीय योगगुरू श्री. सुरेशजी विटकर यांचा शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
महासंघाच्या विद्यमान अध्यक्षा सौ. वृषालीताई मरळ यांच्या हस्ते योगगुरू सुरेशजी विटकर यांचा योग शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी योग, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी विटकर हे सातत्याने कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत सकारात्मक दिशा मिळत असून, त्यांचे योग क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी असल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून झालेल्या या सत्कारामुळे योगगुरू सुरेशजी विटकर यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “आदरणीय योगगुरू सुरेशजी विटकर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” असा शुभेच्छा संदेशही यावेळी देण्यात आला.

